केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कवी लेखक अशोकराव टाव्हरे यांना विशेष मान्यता
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कवी लेखक अशोकराव टाव्हरे यांना विशेष मान्यता
मुंबई / रमेश औताडे
सामान्य घरात जन्म घेऊनही मोठं स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं ही कला ज्यांच्याकडे आहे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी, लेखक व समाजसेवक अशोकराव टाव्हरे. लहानपणापासून समाजसेवेची ओढ मनात बाळगणारे टाव्हरे आज दिल्लीसारख्या राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत छाप सोडत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नुकताच ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. त्याबद्दल त्यांचे दिल्लीला भेट घेऊन अशोकराव टाव्हरे यांनी स्वतः अभिनंदन केले. त्यांनी त्यांना मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर समाजातील सकारात्मक उर्जेचा एक सुंदर संगम होती.
अशोकराव टाव्हरे हे गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी, भ्रष्टाचार, प्रशासनातील मनमानी यांविरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांनी स्थानिक ते केंद्रस्तरापर्यंत अनेक संवेदनशील विषय समाजापुढे आणले आहेत. या पारदर्शक आणि निस्वार्थ कार्याची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वैयक्तिकरित्या घेतली आहे.
विशेष म्हणजे, गडकरी सर्वच शुभेच्छुकांना पत्राद्वारे उत्तर देत नाहीत. मात्र अशोकराव टाव्हरे यांना त्यांनी प्रत्यक्ष पत्र पाठवून आभार मानले. ही बाबच टाव्हरे यांच्या कार्याला मिळालेला सन्मान आहे. गडकरींसारख्या अभ्यासू व व्यस्त नेत्याने दिलेल्या या मान्यतेने अशोकराव यांचा मनोबल निश्चितच द्विगुणित झाले आहे.
आजच्या काळात जिथे स्वतःचा फायदा बघणारे लोक पुढे येतात, तिथे निष्कलंक व नि:स्वार्थ भावनेने समाजासाठी काम करणारे अशोकराव टाव्हरे यांसारखे कार्यकर्ते फार थोडे असतात. त्यांच्या कार्यशक्ती, चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि निर्भय लेखणीला नितीन गडकरींसारख्या नेत्याची दाद मिळणे हे त्यांच्या प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र आहे.
त्यांच्या या प्रवासाला आणि कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा. समाजात परिवर्तन घडवणाऱ्या अशोकराव टाव्हरे यांसारख्या लोकांची संख्या वाढो, हीच अपेक्षा.
Comments
Post a Comment