सुरक्षा रक्षक मंडळात कंत्राटदारांची मनमानी
सुरक्षा रक्षक मंडळात कंत्राटदारांची मनमानी
मुंबई / रमेश औताडे
सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ च्या कायदाचा व नियमावलीचा सरकारला विसर पडल्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळातील कारभार कंत्राटदाराच्या खिशात गेला आहे. अनेक सुरक्षा रक्षक दयनीय अवस्थेत जगात आहेत. सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी , शाखा प्रबंधक हे खाजगी सुरक्षा एजन्सी कंत्राटदारावर गांभीर्याने कारवाई करत नसल्याने खाजगी सुरक्षा एजन्सी कंत्राटदार कायदा खिश्यात घालून मनमानी करत आहेत.
सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी व अध्यक्ष सचिव यांनी मंडळाच्या आनंदित आस्थापना ठेकेदारांकडून हस्तांतरित करुन मंडळाकडे घ्याव्यात , सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या नोंदीत आस्थापना वरील खाजगी सुरक्षा एजन्सी चे कारखाने, कंपन्यांतील नियमबाह्य सुरक्षा रक्षक पुरविण्याचे वाढते अतिक्रमण रोखण्यात यावे अशी मागणी होत आहे. मात्र अध्यक्ष व सचिव यांचे मंडळावर लक्ष नसल्याने त्यांच्याखालील अधिकारी निरीक्षक क्लार्क मनमानी करत आहेत.
पीएफ सरकारी नियमाप्रमाणे जमा केला जात नाही.
खाजगी कंत्राटदार किती आहेत याची माहिती मंडळाकडे उपलब्ध नाही. खाजगी कंत्राटदार कोणत्या आस्थापनेत कार्यरत आहेत व त्यांचा कुणाचा आशीर्वाद आहे त्याबाबत अध्यक्ष गप्प आहेत. कंत्राट नूतनीकरण नियमबाह्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार असूनही त्या खाजगी कंत्राटदाराचे कंत्राट सुरू आहे. तत्काईन कामगार मंत्र्यांना लेखी पत्र देऊनही कामगार मंत्री गप्प का ? काही कामगार नेते भरती प्रक्रियेत गुंग होते आता भरती सुरू करावी म्हणून कामगार मंत्र्यांना सांगत आहेत. या सर्व कारभारावर कामगार मंत्री गप्प का ? असे अनेक सवाल सुरक्षा रक्षक करत आहेत.
Comments
Post a Comment