प्रायोगिक रंगभूमीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद - जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे

प्रायोगिक रंगभूमीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद - जेष्ठ अभिनेते अरुण नलावडे
मुंबई / रमेश औताडे 

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या ऐतिहासिक वास्तूत नाट्य शुक्रवार च्या निमित्ताने नाटकाची तिसरी घंटा वाजत आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी जे काम नाट्य संघटनांनी, नाट्य कलाकारांनी करायला हवे, ते काम मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. ही घटनाच अविश्वसनीय आहे. असे कौतुकाचे उद्गार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी काढले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर, इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि नाट्य शुक्रवार समिती सदस्य रवींद्र देवधर व नयना रहाळकर उपस्थित होते. दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी प्रायोगिक रंगभूमीवरील दर्जेदार नाट्यप्रयोगांचे मोफत सादरीकरण होणार आहे. 

नाट्यप्रेमींना नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे. सहभागी नाट्यसंस्थेला पत्रकार संघातर्फे मोफत सभागृह आणि दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, नाट्य शुक्रवार उपक्रमासाठी इंडियन ऑईल नेहमीच तत्पर असेल, असे आश्वासन इंडियन ऑईलचे कार्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार यांनी दिले. ज्यांना आपल्या कलाकृती सादर करायच्या आहेत, त्यांनी देवदास मटाले (९७६९६६४४६४), रवींद्र देवधर (९४२२३४४५५५) व नयना रहाळकर (९३२२४९२६२९) यांच्याशी संपर्क साधावा. 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन