मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ची हर्षद पाटीलला श्रद्धांजली
मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ची हर्षद पाटीलला श्रद्धांजली
मुंबई / रमेश औताडे
कैलासवासी हर्षद पाटील यांना मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने बांधकाम भवन येथे चार विभागांतील कंत्राटदारांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शासनाने यापुढे अशा घटना टाळाव्यात आणि सर्व ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीने अदा करावीत अशी मागणी करण्यात आली.
अध्यक्ष दादासाहेब ईंगळे, मुकुंद काकड, विजय निकम, नागेश शर्मा, प्रशांत पासलकर, दशरथ बोर्डवेकर, सुभाष पाटील व मुंबईतील ठेकेदार यावेळी उपस्थित होते.
इलाखा शहर विभाग, मध्य मुंबई विभाग, एकात्मिक घटक विभाग, उतर मुंबई विभाग,या चार विभागातील कंत्राटदारांनी बांधकाम भवन मुंबई येथे येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. ईश्वरचरणी हीच प्रार्थना हर्षद पाटील यास शांती लाभो व अशा प्रकारची वेळ कोणत्याही ठेकेदारांवर येऊ नये ही आमची शासनाला विनंती आहे. यापुढे शासनाने याची काळजी घ्यावी व सर्व कंत्राटदारांची प्रलंबित बिले तातडीने द्यावी ही संघटनेच्या वतीने मागणी केली.
Comments
Post a Comment