शाळा कॉलेज हॉटेल मधील अग्नि सुरक्षा ऑडिट
शाळा कॉलेज हॉटेल मधील अग्नि सुरक्षा ऑडिट
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या विधानसभेतून सूचना
मुंबई / रमेश औताडे
उंच शाळा इमारती, हॉटेल्स, गर्दीच्या बाजारपेठा यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजना अत्यावश्यक आहेत. शाळा इमारतींसह सर्व आस्थापनांची फायर ऑडिट तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.
या प्रकरणी विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत विधानसभा सदस्य योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.
सदोष वीज प्रणालीमुळे किंवा इतर कारणामुळे लागलेल्या आगी विझविताना जी उपकरणे वापरली जातात त्याचे ऑडिट काटेकोर करावे. अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र किंवा अग्निरोधक साहित्य परवाना नसलेल्यांना नोटीस काढली असली तरी त्याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.
अग्निसुरक्षा पालन कक्षामार्फत तपासणी केली जाते. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या आस्थापनांचा इंधन साठा जप्त करणे तसेच इंधन पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सभागृहात सांगितले
Comments
Post a Comment