कचरा दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त

रमेश औताडे
प्रतिनिधी – नवी मुंबई

घणसोली पामबीच मार्गावर मालकंस ते साईबाबा मंदिर दरम्यानच्या भागात अनेक दिवसांपासून साफसफाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्ट्रीट कचरा कुंडीतून कचरा रस्त्यावर सांडत असून त्यातून प्रचंड दुर्गंधी पसरत आहे.

या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांची संख्या वाढली असून सर्दी-खोकल्यासारखे त्रास वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे रहदारी करणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेला नुकताच स्वच्छता पुरस्कार मिळाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात अशा प्रकारची स्थिती पाहता, हा पुरस्कार कितपत योग्य आहे, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

"कचऱ्याची वेळेवर उचल होत नाही, वारंवार तक्रार करूनही काहीच परिणाम होत नाही," अशी प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने दिली.

प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन नियमित साफसफाई करावी आणि आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा