स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने
स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने नवी मुंबई / रमेश औताडे स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शिधावाटप अधिकारी छाया पालवे यांना घणसोली मधील शिधावाटप दुकानावर कारवाई करण्याबाबत नवी मुंबई शिधावाटप अधिकारी छाया पालवे यांना यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील गरीब, गरजू तसेच पात्र लाभार्थ्यांना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक माध्यम आहे. या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील महत्त्वाचा भाग असलेले रास्तभाव / शिधा वाटप दुकाने अर्थात रेशन दुकाने ही जीवनावश्यक वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, या जीवनावश्यक वस्तू विहित वेळेत जनतेमध्ये वाटप करणे गरजेचे असताना दुकानदाराकडून मात्र या ग्राहकोपयोगी वस्तूचे वेळेत, नियमित आणि दररोज वाटप होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत....
Comments
Post a Comment