Posts

Showing posts from April, 2025

एम एस सी - आय टी कोर्स आता ए आय च्या स्पर्शाने

Image
        एम एस सी - आय टी कोर्स आता ए आय च्या स्पर्शाने मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र ज्ञान महामंडळ  ने आपला लोकप्रिय एम एस सी आय टी कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज करत नव्याने सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रासह देशभरात १ कोटी ६५ लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या कोर्समध्ये आता १०० हून अधिक ए आय टूल्स व ४०० पेक्षा अधिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. तंत्रज्ञान विभागून कमी होत असतानाच आता ए आय जाणणारे आणि न जाणणारे अशी नवी दरी तयार होत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी एम के सी एल  ने हा कोर्स नव्याने तयार केला आहे. चॅट जिपीटी, गुगल जेमिनी, मायक्रोसॉफ्ट कोपॉयलट यांसारख्या टूल्सचा वापर, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, डिजिटल व्यवहार, आणि ए आय वापरून अभ्यासात किंवा कामात कशी मदत मिळवता येईल, याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जात आहे. राज्यातील साडेचार हजारहून अधिक अधिकृत केंद्रांमधून हा कोर्स शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. संगणक साक्षरतेबरोबरच नवयुगातील तंत्रज्ञान कौशल्ये देणे हे या उपक...

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मेट्रो स्थानकात " एव्हरलाइट "

Image
   अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मेट्रो स्थानकात " एव्हरलाइट " मुंबई / रमेश औताडे  दागिन्यांच्या बाजारपेठेत एक नवा मापदंड स्थापित करत सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने आपले नवे एव्हरलाइट बाय सेन्को स्टोअर मुंबईतील वर्दळीच्या अंधेरी मेट्रो स्थानकात सुरू केले आहे. या प्रकारचे हे पहिलेच स्टोअर आहे.  अंधेरी मेट्रो स्थानकातील स्टोअरच्या या भव्य उद्घाटन सोहळ्यातील ग्लॅमर आणि उत्साह वृद्धिंगत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर उपस्थित होती. मानुषी छिल्लर म्हणाल्या, "सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईमध्ये सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या नवीन स्टोअर लाँचचा भाग असल्याचा मला आनंद होत आहे.  या उद्घाटनाबद्दल सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या संचालक जोइता सेन म्हणाल्या, "मुंबईचे आमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि सेन्कोचा अनुभव मुंबईच्या मेट्रो नेटवर्कच्या केंद्रस्थानी आणत आहोत. मुख्य महाव्यवस्थापक धवल राजा म्हणाले, “अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने भारतात आमची उपस्थिती वाढवत असताना एव्हरलाइट बाय सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचा हलक्या वजनाच्या दागिन्यांचा ...

आंब्याच्या चाहत्यांसाठी खास बातमी !

Image
              आंब्याच्या चाहत्यांसाठी खास बातमी ! सांगलीचा अस्सल "केशर आंबा" आता थेट तुमच्या घरपोच मिळवा बळीराजाच्या अमराईतून, ग्राहकराजाच्या घरी ! आमच्याकडे मिळतातः नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले केशर आंबे गवतात पिकवलेले - केमिकल फ्री मधुर चव, सुंदर रंग, आणि दर्जेदार फळं प्रत्येक फळ शेतकऱ्याच्या प्रेमाने निवडलेलं घरपोच सेवा उपलब्ध* हंगामी मर्यादित स्टॉक आजच ऑर्डर करा ! केशर आंब्यांचा बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध आहे. (किंमत व संख्येसाठी संपर्क साधा) ऑर्डरसाठी संपर्कः 8108937126 (व्हॉट्सअॅप वर ऑर्डर द्या) व्हॉइस कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज, किंवा मिस्ड कॉल दिल्यास आम्ही परत संपर्क करू. "शुद्धतेची खात्री, शेतकऱ्यांची मेहनत - तुमच्यापर्यंत !"

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेची उंची वाढते – राज्यपाल

Image
  अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेची उंची वाढते – राज्यपाल मुंबई / रमेश औताडे  आरोग्याची काळजी घेत उपचार पद्धतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आरोग्यसेवेची उंची वाढते असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पिटल समूहाचा भाग असलेल्या मुंबई वडाळा येथील आदित्य ज्योत आय हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल म्हणाले, "डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलमध्ये आमचा प्रवास गेल्या काही वर्षांत केवळ संख्यात्मक वाढीपुरता मर्यादित राहिला नाही, तर आम्ही दिलेल्या सेवांचा दर्जा आणि आरोग्यसेवेचा दर्जाही लक्षणीयरीत्या वाढवला आहे. भारतात आणि परदेशात मिळून २३० हून अधिक रुग्णालये असून, यामध्ये महाराष्ट्रातील ३० रुग्णालयांचा समावेश आहे. आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक प‌द्मश्री प्रोफेसर डॉ. एस. नटराजन म्हणाले, "हे परिवर्तन म्हणजे जागतिक दर्जाची नेत्रसेवा देण्याच्या आपल्या ध्येयातील एक मोठा टप्पा आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांपर्यंत ...

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजिव रंजन सिंह यांचे मच्छिमार नेते किरण कोळी यांना मुंबई भेटीत दिले आश्वासन

Image
         समुद्रातील संघर्षाकडे केंद्र सरकारचे गांभीर्याने लक्ष ;    केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजिव रंजन सिंह यांचे मच्छिमार नेते      किरण कोळी यांना मुंबई भेटीत दिले आश्वासन मुंबई  / रमेश औताडे पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या समजून घेत सरकार त्यांच्या बाजूने निर्णय घेईल, असे आश्वासन केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजिव रंजन सिंह यांनी "   एम एम के एस  " या मच्छीमार संघटनेचे सरचिटणीस किरण कोळी यांना दिले. मुंबईत ताज हॉटेल मध्ये तीन राज्यांच्या मच्छीमार संघटनेच्या नेत्यांच्या एका बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी हे आश्वासन दिले. पावसाळा उशिरा सुरू होत असल्याने १ जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान असलेली सध्याची मासेमारीची बंदी लहान मच्छिमारांसाठी अडचण निर्माण करत असल्याचे मच्छीमार संघटनेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत निवेदन दिले असता त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत सरकार पारंपारिक मच्छीमारांच्या बाजूनेच आहे असे सांगीतले. पूर्वीप्रमाणे १० जून ते १५ ऑगस्ट अशी ६३ दिवसांची बंदी लागू करावी, अश...

बेस्ट उपक्रम टिकविण्यासाठी भाडेवाढ गरजेची

Image
           बेस्ट उपक्रम टिकविण्यासाठी भाडेवाढ गरजेची मुंबई / रमेश औताडे  बेस्ट उपक्रम टिकविण्यासाठी भाडेवाढ गरजेची आहे. त्यामुळे भाडेवाढ प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली असून आता परिवहन प्राधिकरणाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत बेस्टच्या वाढीव खर्चाचा आढावा घेतला गेला होता. त्यानंतर पालिकेने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बेस्टचा सध्या सहा हजार कोटींचा तुटवडा आहे आणि नवीन बसगाड्यांची खरेदीही आवश्यक आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नसल्याचे  अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. २०१८ नंतर सात वर्षांनी बेस्टच्या भाड्यात वाढ केली जात आहे. इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि कर्मचारी पगार वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांची देणी देण्यास बेस्टकडे निधी नाही. अनेक बस डागडुजी करून चालविल्या जात आहेत. सध्या बेस्टला ८४५ कोटींचा महसूल मिळतो. भाडेवाढ झाल्यास १४०० कोटी पर्यंत हा महसूल जाऊ शकतो. बेस्ट चे सध्याचे पाच रुपये भाडे असल्या...

जेष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक विधान भवनात...श्री.योगेश त्रिवेदी व श्री.विलास मुकादम

Image
या फाईली फक्त कागदांचे गठ्ठे नाहीत, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत.  मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीची साक्ष देणाऱ्या या फाईली... त्या फाईलींच्या पानांमध्ये दडलेल्या असंख्य गोष्टी... आणि त्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार असलेले हे दोन जेष्ठ पत्रकार ! आपल्या अचूक निरीक्षण आणि अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर, हे प्रामाणिक पत्रकार विधान मंडळाच्या सुवर्णक्षणांपासून ते संघर्षमय काळापर्यंतच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या अनुभवी हातांत या फाईली फक्त कागदांचे गठ्ठे नाहीत, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत. पत्रकारितेची खरी जबाबदारी म्हणजे फक्त वर्तमान सांगणे नव्हे, तर इतिहास जतन करणे — आणि हेच काम ते निःस्वार्थपणे करत आहेत."

श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह

Image
श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह  मुंबई / रमेश औताडे  मानवसेवा आणि गोमातेच्या सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुरभि श्याम गौशाला भगवती सेवा समितीच्या वतीने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह आणि १०८ मूल पारायण चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत इंदल सिंह यांनी दिली. माहेश्वरी प्लॉट, योगी नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई  येथे आयोजित करण्यात आले आहे. कथा वाचन अनंत श्री विभूषित श्रीमद जगतगुरु द्वाराचार्य श्री अग्रपीठाधिश्वर आणि मलुकपीठाधिश्वर, परमपूज्य श्री राजेंद्रदास महाराजांचे  शिष्य  राजेंद्रदास महाराज अनंत महाराज, ३०० ब्राह्मण या सप्ताहात येणार आहेत.  बालमुकुंद गट्टाणी, इंदल सिंह, ऋषिकेश दुबे आणि स्थानिक संस्थेचे मुख्य विश्वस्त योगेश्वर धाम मंदिर योगी नगर चे रामेश्वर डागा आणि श्री त्रिवेणी फाउंडेशनचे संयोजक अभिषेक जाजू यांनी सप्ताह आयोजन केले आहे. यावेळी इंदल सिंह म्हणाले, गोमाता जगली तर पृथ्वी जगेल. जगात शांतता नांदेल. यासाठी आम्ही गो माता आश्रम निर्माण केले आहेत. संस्थेचे मूळ उद्दिष्ट...

सुरेश टुकरुल यांचा रुग्ण मित्रांकडून सत्कार

Image
             सुरेश टुकरुल यांचा रुग्ण मित्रांकडून सत्कार  मुंबई / रमेश औताडे  मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सामान्यांना नियमित मदत करणारे साथी सुरेश ठुकरुल यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुग्ण मित्र विनोद साडविलकर, रमेश चव्हाण, प्रफुल्ल पवार,श्रीविद्या सरवणकर, गोविंद मोरे यांनी साप्ताहिक ‌"मावळ मराठा"  वर्धापन दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित समारंभात  शाल,पुष्पगुच्छ,मिष्ठान्न व "कर्करोग बरा होऊ शकतो" हे पुस्तक देऊन सुरेश ठुकरूल यांचा सन्मान केला. याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तसेच प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक प्रदीप म्हापसेकर आदि मान्यवरांनी  सुरेश ठुकरूल यांचे अभिनंदन करून त्यांना उत्तम आरोग्यासाठी सुयश चिंतीले.

अवयव दात्यांसाठी धाऊन आलेला देवदूत ......

Image
             अवयव दात्यांसाठी धाऊन आलेला देवदूत -                 महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई / रमेश औताडे  राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती, पारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. आरोग्य भवन येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. यावेळी आमदार श्रीमती देवयानी फरांदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिकारी, मानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री.आबिटकर यांनी अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र (Zonal Transplant Coordination Center-ZTCC) स्थापन करण्याच्या...

बसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ

Image
बसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ            मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई / रमेश औताडे  मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसचा वापर वाढविण्याचा निर्णय झालेला असताना त्या बसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने बेस्ट प्रशासन मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप जनता दल (से) पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मुंबई शहराची ओळख आता जगातील प्रदूषित शहरांमधील एक अशी होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईकरांना विविध श्वसनविकारांना तोंड द्यावे लागत असून अनेकांचा त्यात मृत्यूही होत आहे. अशा गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शुद्ध हवा अभियाना अंतर्गत इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वातानुकूलित एक मजली २१०० बस भाड्याने घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने मे २०२२ मध्ये घेतला होता.  या बस पुरविण्याची तयारी इव्हेट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड सह टाटा मोटर्स, स्विच मोबिलिटी आदी आठ कंपन्यांनी दर्शवली होती. त्यात बेस्ट व्यवस्थापनाने इवेट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंप...

सामान्य जनतेची तीन हजार कोटींची फसवणूक

Image
          सामान्य जनतेची तीन हजार कोटींची फसवणूक  मुंबई / रमेश औताडे  डॉलस इन्फोटेक प्रा. लि. (पूर्वीचे डॉलस इन्फोटेक पार्कटेक लिमिटेड) या कंपनीविरोधात सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप करत "असोसिएशन फॉर इन्फॉर्म डिलिव्हरी फ्रँचायझी" या संघटनेने  मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत या घोटाळ्याची  सीबीआय आणि ईडी मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी  मागणी यावेळी करण्यात आली.तसेच २ मे रोजी दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विशाल स्वैन, विनोद राठोड, अभिषेक धुर्वे, मोनिका चौधरी आणि गुरविंदर सिंग या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. भारतातील २००० पेक्षा अधिक गुंतवणूकदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या घोटाळ्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. डॉलस इन्फोटेकने ईकॉम डिलिव्हरीच्या नावाखाली लोन स्कीमच्या माध्यमातून पैसे उकळले आणि फसवणूक करत  ईकॉम डिलिव्हरीच्या नावाखाली हा घोटाळा केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी विविध दस्तऐवज, पुरावे सादर करत आपली बाजू मांडत संघटनेने केंद्र व राज्य स...

महाराष्ट्र राज्य लॉटरी व्यवस्थेत सुधारणा प्रक्रियेला चालना

Image
राज्य लॉटरी व्यवस्थेत सुधारणा प्रक्रियेला चालना – सरकारकडून प्रयत्न सुरू मुंबई  / रमेश औताडे  महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सध्याच्या वितरण व्यवस्थेबाबत विक्रेत्यांकडून काही अडचणी व्यक्त करण्यात आल्या असल्या, तरी शासन या व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे. राज्य सरकारच्या लॉटरी वितरण व्यवस्थेबाबत महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत. सध्या राज्य लॉटरीच्या तिकीट वितरणासाठी विक्रेत्यांना नवी मुंबईतील कार्यालयात जावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील विक्रेत्यांना तिकीट मिळवण्यात अडचणी येतात. यासंदर्भात सरकारकडून प्रणाली सुधारण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. राज्य शासनाने सणासुदीच्या काळात डिअर, राजश्री, गोल्डन या लॉटऱ्यांच्या विक्रीत वाढ झाल्याची नोंद घेतली असून, विक्रेत्यांचा लाभ वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळाले आहेत. दिवाळी, गुढीपाडवा आदी सणांच्या कालावधीत लॉटरी विक्रीत ७०-७५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. राज्य शासन विक्रेत्यांचे हित जपत लवकरच लॉटरी वितरण ...

संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन

Image
     संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन मुंबई / रमेश औताडे  सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील माळेवाडी येथे श्री क्षेत्र विठ्ठल मंदिरात ७ मे २०२५ पासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला भव्य सुरुवात होणार आहे. हा सोहळा १३ मे २०२५ पर्यंत चालणार असून, भाविकांसाठी हे एक अध्यात्मिक पर्व ठरणार आहे. या भागवत कथांचे प्रवचन परंपरेने किर्तनसेवा करणारे ह.भ.प. भागवत महाराज शिंदे ( परभणीकर ) यांच्या वाणीने होणार आहे. कथा दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणार असून, सकाळी काकडा व सायंकाळी हरिपाठ होईल. कथेला संगीत साज लाभणार असून, गायक म्हणून शिवहर डांगे, नवनाथ कुरुडे आणि गणेश जाधव, सिंथवादक दिपक साबळे ( परभणीकर ) आणि तबला वादक विष्णू कदम सहभागी होणार आहेत. कथेनंतर १३ मे रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत ह.भ.प. धर्मराज महाराज सुर्यवंशी यांचे काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, माळेवाडी यांनी केले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मि...

मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार

Image
मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार                                                                                 मुंबई /रमेश औताडे  ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही ४३ व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  सोमवार दि. २८ एप्रिल, मंगळवार, दि. २९ एप्रिल आणि बुधवार दि. ३० एप्रिल २०२५ असे तीन दिवस ही वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या संकल्पनेप्रमाणे समाजाला बौद्धिक मेजवानी देण्याचा उद्देश कार्यकर्त्यांनी कायम जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत देण्यात ये...

जन सुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Image
जन सुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना आणि आंदोलकांनी एकत्र येत ‘जन सुरक्षा विधेयक २०२४’ विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या विधेयकाविरोधात ‘जन सुरक्षा विधेयक २०२४ विरोधी समिती’च्या वतीने येत्या २२ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या विधेयकाविरोधात ग्रामीण भागातील लोकशाहीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळी, संघटना आणि कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी विधेयकाला "दडपशाहीविरोधी चळवळींवर गदा आणणारे" असे संबोधले आहे. समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आणि तेवढ्यावरच न थांबता सरकारवर दबाव टाकण्यासाठी मैदानात उतरायचे जाहीर करण्यात आले. यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात सकाळी ११ वाजता एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी, शिवशक्ती, लोक संघर्ष संघटना, प्रबुद्ध साहित्य परिषद, महाराष्ट्र मुस्लिम मंच अशा अनेक संघटनांचा सहभाग असणार आहे. संयुक्त वक्त...

जगभरातील बहाईं समाजासाठी आध्यात्मिक चिंतनाचा काळ

Image
     जगभरातील बहाईं समाजासाठी आध्यात्मिक चिंतनाचा काळ मुंबई / रमेश औताडे  मुंबईसह संपूर्ण जगभरातील बहाई समाज आनंदाने 'रिदवान' हा उत्सव साजरा करत आहे. हा १२ दिवसांचा सण आहे जो बहाई धर्मसंस्थापक भगवान बहाउल्लाह यांना या युगासाठी ईश्वराचा संदेशवाहक घोषित करण्यात आल्याच्या आठवणी प्रित्यर्थ साजरा केला जातो. ही घटना बहाई प्रशासनाच्या युगाची सुरुवात दर्शवते. रिदवान सणादरम्यान, बहाई भगवान बहाउल्लाह यांचा संदेश आणि आधुनिक समाजातील त्याच्या महत्त्वावर चिंतन केले जाते. भगवान बहाउल्लाह म्हणाले होते, “पृथ्वी ही फक्त एक देश आहे आणि मानवजात त्याचे नागरिक.” या विचारामुळे आजच्या जगाला प्रेम, एकता, करूणा आणि सहकार्याचे महत्त्व समजते. मुंबईतील बहाईंसाठी हा काळ साजरा करण्यासाठी एकत्र येणे, प्रार्थना करणे, ईश्वराचे स्तुतिगान करणे आणि पवित्र ग्रंथांचे वाचन याचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम स्थानिक आध्यात्मिक सभेच्या निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर होतो, ज्यात २१ वर्षांवरील पात्र सदस्य स्थानिक आध्यात्मिक सभेचे प्रतिनिधी निवडतात. ही सभा समाज...