सामान्य जनतेची तीन हजार कोटींची फसवणूक

          सामान्य जनतेची तीन हजार कोटींची फसवणूक 
मुंबई / रमेश औताडे 

डॉलस इन्फोटेक प्रा. लि. (पूर्वीचे डॉलस इन्फोटेक पार्कटेक लिमिटेड) या कंपनीविरोधात सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप करत "असोसिएशन फॉर इन्फॉर्म डिलिव्हरी फ्रँचायझी" या संघटनेने  मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत या घोटाळ्याची  सीबीआय आणि ईडी मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी  मागणी यावेळी करण्यात आली.तसेच २ मे रोजी दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विशाल स्वैन, विनोद राठोड, अभिषेक धुर्वे, मोनिका चौधरी आणि गुरविंदर सिंग या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. भारतातील २००० पेक्षा अधिक गुंतवणूकदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या घोटाळ्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. डॉलस इन्फोटेकने ईकॉम डिलिव्हरीच्या नावाखाली लोन स्कीमच्या माध्यमातून पैसे उकळले आणि फसवणूक करत  ईकॉम डिलिव्हरीच्या नावाखाली हा घोटाळा केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी विविध दस्तऐवज, पुरावे सादर करत आपली बाजू मांडत संघटनेने केंद्र व राज्य सरकारकडे तसेच प्रशासनाकडे याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. कंपनीने ९५० हून अधिक बनावट फ्रँचायझी विकल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये राज्य, विभागीय, जिल्हा आणि पिन कोड स्तरावरील फ्रँचायझी मॉडेल्सचा समावेश होता अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यापूर्वी रोडएक्स, जस्ट डिलिव्हरी आणि इतर बनावट कंपन्यांद्वारे असेच घोटाळे केले आहेत. प्रत्येक वेळी नवीन नाव आणि बनावट संचालकांसह कंपनी स्थापन केली जाते, जी 9 ते 10 महिने चालते आणि नंतर गायब होते. या बोगस कंपनीशी संबंधित लोकांच्या बनावट डिजिटल ओळखी गोळा केल्या आहेत, लिंक्डइन प्रोफाइल आणि संबंधित कागदपत्रे बदलली आहेत, ज्यामुळे हा संघटित आर्थिक गुन्ह्याचा स्पष्ट खटला बनला आहे.




Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री