एम एस सी - आय टी कोर्स आता ए आय च्या स्पर्शाने
एम एस सी - आय टी कोर्स आता ए आय च्या स्पर्शाने
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ने आपला लोकप्रिय एम एस सी आय टी कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज करत नव्याने सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रासह देशभरात १ कोटी ६५ लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या कोर्समध्ये आता १०० हून अधिक ए आय टूल्स व ४०० पेक्षा अधिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तंत्रज्ञान विभागून कमी होत असतानाच आता ए आय जाणणारे आणि न जाणणारे अशी नवी दरी तयार होत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी एम के सी एल ने हा कोर्स नव्याने तयार केला आहे.
चॅट जिपीटी, गुगल जेमिनी, मायक्रोसॉफ्ट कोपॉयलट यांसारख्या टूल्सचा वापर, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, डिजिटल व्यवहार, आणि ए आय वापरून अभ्यासात किंवा कामात कशी मदत मिळवता येईल, याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जात आहे.
राज्यातील साडेचार हजारहून अधिक अधिकृत केंद्रांमधून हा कोर्स शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. संगणक साक्षरतेबरोबरच नवयुगातील तंत्रज्ञान कौशल्ये देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
Comments
Post a Comment