जन सुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा



जन सुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना आणि आंदोलकांनी एकत्र येत ‘जन सुरक्षा विधेयक २०२४’ विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या विधेयकाविरोधात ‘जन सुरक्षा विधेयक २०२४ विरोधी समिती’च्या वतीने येत्या २२ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या विधेयकाविरोधात ग्रामीण भागातील लोकशाहीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळी, संघटना आणि कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी विधेयकाला "दडपशाहीविरोधी चळवळींवर गदा आणणारे" असे संबोधले आहे. समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आणि तेवढ्यावरच न थांबता सरकारवर दबाव टाकण्यासाठी मैदानात उतरायचे जाहीर करण्यात आले.

यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात सकाळी ११ वाजता एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी, शिवशक्ती, लोक संघर्ष संघटना, प्रबुद्ध साहित्य परिषद, महाराष्ट्र मुस्लिम मंच अशा अनेक संघटनांचा सहभाग असणार आहे.

संयुक्त वक्तव्यात असे नमूद करण्यात आले की, “हे विधेयक केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा धोका आहे.” या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरात जनजागृती अभियानही राबवण्यात येणार आहे.
यावेळी खासदार वर्षा गायकवाड, आमदार सचिन अहिर, कॉ. प्रकाश रेड्डी, ॲड.राजेंद्र कोरडे, कॉ शैलेंद्र कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन