महाराष्ट्र राज्य लॉटरी व्यवस्थेत सुधारणा प्रक्रियेला चालना



राज्य लॉटरी व्यवस्थेत सुधारणा प्रक्रियेला चालना – सरकारकडून प्रयत्न सुरू
मुंबई  / रमेश औताडे 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सध्याच्या वितरण व्यवस्थेबाबत विक्रेत्यांकडून काही अडचणी व्यक्त करण्यात आल्या असल्या, तरी शासन या व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सकारात्मक पावले उचलत आहे. राज्य सरकारच्या लॉटरी वितरण व्यवस्थेबाबत महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत.

सध्या राज्य लॉटरीच्या तिकीट वितरणासाठी विक्रेत्यांना नवी मुंबईतील कार्यालयात जावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील विक्रेत्यांना तिकीट मिळवण्यात अडचणी येतात. यासंदर्भात सरकारकडून प्रणाली सुधारण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे.

राज्य शासनाने सणासुदीच्या काळात डिअर, राजश्री, गोल्डन या लॉटऱ्यांच्या विक्रीत वाढ झाल्याची नोंद घेतली असून, विक्रेत्यांचा लाभ वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळाले आहेत. दिवाळी, गुढीपाडवा आदी सणांच्या कालावधीत लॉटरी विक्रीत ७०-७५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

राज्य शासन विक्रेत्यांचे हित जपत लवकरच लॉटरी वितरण सुलभ करण्याच्या दिशेने निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन