श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह
श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह
मुंबई / रमेश औताडे
मानवसेवा आणि गोमातेच्या सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुरभि श्याम गौशाला भगवती सेवा समितीच्या वतीने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह आणि १०८ मूल पारायण चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत इंदल सिंह यांनी दिली.
माहेश्वरी प्लॉट, योगी नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. कथा वाचन अनंत श्री विभूषित श्रीमद जगतगुरु द्वाराचार्य श्री अग्रपीठाधिश्वर आणि मलुकपीठाधिश्वर, परमपूज्य श्री राजेंद्रदास महाराजांचे शिष्य राजेंद्रदास महाराज अनंत महाराज, ३०० ब्राह्मण या सप्ताहात येणार आहेत.
बालमुकुंद गट्टाणी, इंदल सिंह, ऋषिकेश दुबे आणि स्थानिक संस्थेचे मुख्य विश्वस्त योगेश्वर धाम मंदिर योगी नगर चे रामेश्वर डागा आणि श्री त्रिवेणी फाउंडेशनचे संयोजक अभिषेक जाजू यांनी सप्ताह आयोजन केले आहे. यावेळी इंदल सिंह म्हणाले, गोमाता जगली तर पृथ्वी जगेल. जगात शांतता नांदेल. यासाठी आम्ही गो माता आश्रम निर्माण केले आहेत. संस्थेचे मूळ उद्दिष्ट तेच आहे. सनातन धर्माचे एकमेव उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या सप्ताहात ३ ते ४ हजार कार्यकर्ते तसेच साधू संत येणार आहेत.
Comments
Post a Comment