केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजिव रंजन सिंह यांचे मच्छिमार नेते किरण कोळी यांना मुंबई भेटीत दिले आश्वासन



         समुद्रातील संघर्षाकडे केंद्र सरकारचे गांभीर्याने लक्ष ; 

  केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजिव रंजन सिंह यांचे मच्छिमार नेते      किरण कोळी यांना मुंबई भेटीत दिले आश्वासन


मुंबई  / रमेश औताडे

पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या समजून घेत सरकार त्यांच्या बाजूने निर्णय घेईल, असे आश्वासन केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजिव रंजन सिंह यांनी "   एम एम के एस  " या मच्छीमार संघटनेचे सरचिटणीस किरण कोळी यांना दिले. मुंबईत ताज हॉटेल मध्ये तीन राज्यांच्या मच्छीमार संघटनेच्या नेत्यांच्या एका बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

पावसाळा उशिरा सुरू होत असल्याने १ जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान असलेली सध्याची मासेमारीची बंदी लहान मच्छिमारांसाठी अडचण निर्माण करत असल्याचे मच्छीमार संघटनेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत निवेदन दिले असता त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत सरकार पारंपारिक मच्छीमारांच्या बाजूनेच आहे असे सांगीतले.

पूर्वीप्रमाणे १० जून ते १५ ऑगस्ट अशी ६३ दिवसांची बंदी लागू करावी, अशी मागणी किरण कोळी यांनी केली असता, सिंह म्हणाले, पारंपरिक व छोटे मच्छीमार यांच्या बाबत मी व सरकार सकारात्मक आहे. मला वेगवेगळ्या राज्यांतून सूचना आल्या असून यासाठी मी समिती स्थापन केली आहे. पारंपरिक मच्छिमारांना आम्ही प्राधान्य देणार आहे. 

मच्छिमार संघटनेच्या शिष्टमंडळात एम एम के एस चे सरचिटणीस किरण कोळी, मढ मच्छिमार विकास संस्थेचे सचिव अक्षय कोळी, भाटी मच्छिमार सर्वोदय संस्थेचे व्हिलसन कोळी, लॉइड कोळी, रुपेश कोळी, मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कोळी, तसेच नवीन कोळी आणि मनोहर कोळी सहभागी झाले होते.

मुंबईतील  केंद्रीय मंत्र्यांच्या झालेल्या या पत्रकार परिषदेत मढ, भाटी, मालवणी, मनोरी आणि गोराई भागातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी सिंह यांची भेट घेत सर्व समस्या सांगितल्या असता त्यांनी लवकरच याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे सांगितले.


Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन