अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेची उंची वाढते – राज्यपाल

  अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेची उंची वाढते – राज्यपाल
मुंबई / रमेश औताडे 

आरोग्याची काळजी घेत उपचार पद्धतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आरोग्यसेवेची उंची वाढते असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. डॉ.अग्रवाल्स आय हॉस्पिटल समूहाचा भाग असलेल्या मुंबई वडाळा येथील आदित्य ज्योत आय हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते.

डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल म्हणाले, "डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलमध्ये आमचा प्रवास गेल्या काही वर्षांत केवळ संख्यात्मक वाढीपुरता मर्यादित राहिला नाही, तर आम्ही दिलेल्या सेवांचा दर्जा आणि आरोग्यसेवेचा दर्जाही लक्षणीयरीत्या वाढवला आहे. भारतात आणि परदेशात मिळून २३० हून अधिक रुग्णालये असून, यामध्ये महाराष्ट्रातील ३० रुग्णालयांचा समावेश आहे.

आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक प‌द्मश्री प्रोफेसर डॉ. एस. नटराजन म्हणाले, "हे परिवर्तन म्हणजे जागतिक दर्जाची नेत्रसेवा देण्याच्या आपल्या ध्येयातील एक मोठा टप्पा आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्याची, नेत्रचिकित्सा क्षेत्रातील पुढील पिढीच्या नेतृत्वाला प्रशिक्षण देण्याची आणि नेत्रआरोग्य क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून आपली परंपरा पुढे नेण्याची क्षमता आणखी बळकट झाली आहे.३१ मे पर्यंत ५० वर्षापुढील नागरिकांना मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.





Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री