संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन
संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन
मुंबई / रमेश औताडे
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील माळेवाडी येथे श्री क्षेत्र विठ्ठल मंदिरात ७ मे २०२५ पासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला भव्य सुरुवात होणार आहे. हा सोहळा १३ मे २०२५ पर्यंत चालणार असून, भाविकांसाठी हे एक अध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
या भागवत कथांचे प्रवचन परंपरेने किर्तनसेवा करणारे ह.भ.प. भागवत महाराज शिंदे ( परभणीकर ) यांच्या वाणीने होणार आहे. कथा दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणार असून, सकाळी काकडा व सायंकाळी हरिपाठ होईल.
कथेला संगीत साज लाभणार असून, गायक म्हणून शिवहर डांगे, नवनाथ कुरुडे आणि गणेश जाधव, सिंथवादक दिपक साबळे ( परभणीकर ) आणि तबला वादक विष्णू कदम सहभागी होणार आहेत.
कथेनंतर १३ मे रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत ह.भ.प. धर्मराज महाराज सुर्यवंशी यांचे काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, माळेवाडी यांनी केले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मिक आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment