शासनाकडे प्रभाकर तुकाराम कांबळे यांची महत्वपूर्ण मागणी
मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये गुणवंत कामगारांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी ही मागणी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्याच्या सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासात गुणवंत कामगारांचे योगदान मोठे आहे. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून समाज व राज्याच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या कामगारांना त्यांच्या कार्याची योग्य दखल घेत सन्मान आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक गुणवंत कामगारांना मुंबई व उपनगरांमध्ये परवडणारी घरे मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. मुंबई महानगर परिसरातील वाढती घरांच्या किमती, मर्यादित उत्पन्न आणि वाढता जीवनावश्यक खर्च लक्षात घेता गुणवंत कामगारांसाठी म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये स्वतंत्र कोटा किंवा आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कांबळे यां...