राष्ट्रीय शेअर बाजारात कृषी फलोत्पादन , सिंचन प्रक्रिया परिषद आणि प्रदर्शन संपन्न
मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या (एमएसएमजीए) वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त मुंबई येथील राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, मार्केटिंग, कोल्डचेन व वेअर हाऊसिंग परिषद आणि सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एमएसएमजीए अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले की, शेतकरी हवामान बदलाचा सामना करत आणि मोठा खर्च करून उत्पादन घेतो, परंतु सक्षम विपणन (मार्केटिंग) व्यवस्थेअभावी तो निष्प्रभ ठरतो. शेतकऱ्यांना सक्षम मार्केटिंग मिळवून देण्यासाठी एनएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंबा उत्पादकांचे नुकसान व ईसीजीसीचे सहकार्य: यावर्षी आंब्याचे उत्पादन केवळ १५ ते २० टक्केच आले. एकूण उत्पादनापैकी १५ टक्के आंबा निर्यात होतो, ज्यातील ५० टक्के निर्यात मध्यपूर्व (मिडल ईस्ट) देशांत होते. मात्र अमेरिका-इझरायल विरुद्ध इराण युद्धामुळे ही निर्यात ठप...