Posts

विश्व धरोहर दिवस २०२५ निमित्त ऑनलाईन सेमिनार

Image
           विश्व धरोहर दिवस २०२५ निमित्त ऑनलाईन सेमिनार मुंबई / रमेश औताडे  विश्व धरोहर दिवस २०२५ च्या निमित्ताने उत्तर मध्य रेल्वे मुख्यालयात एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आला. या सेमिनारच्या अध्यक्षस्थानी महाप्रबंधक उपेंद्र चंद्र जोशी होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोलापूर येथील डॉ. वेंकटेश पगार यांनी ‘हेरिटेज’ अर्थात वारसा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या वेळी देशभरातील रेल्वेच्या धरोहर स्थळांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. लोकांमध्ये प्राचीन वारसा जपण्याचे महत्त्व पटवून देणे हा या सेमिनारचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात अनीष सिन्हा (पीसीएमई), अमित मालवी (वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी), मुख्यालय व मंडळातील इतर अधिकारी, सुपरवायझर ट्रेनिंग सेंटर, झाशी येथील सर्व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. एकूण २०० लोकांनी या सेमिनारमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण व गृह व्यवस्थापनावरील मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.

जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ अहिंसक आंदोलनाचा इशारा

Image
   जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ अहिंसक आंदोलनाचा इशारा मुंबई / रमेश औताडे  मुंबई विलेपार्ले येथील १९३५ साली बांधकाम केलेले १०८ पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगर पालिकेने तोडल्याने अखिल भारतीय सकल जैन समाज संतप्त झाला असून,  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत " अहिंसक आंदोलन " करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण जैन यांनी सांगितले की, "अहिंसक आणि शांतताप्रिय जैन समाजाच्या श्रद्धास्थानांवर प्रशासनाने जाणूनबुजून केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र विरोध करतो. ही केवळ मुंबईतील नव्हे तर संपूर्ण देशातील जैन समाजाच्या श्रद्धेवर आघात आहे असे अनिल शाह यांनी सांगितले. समाजाने संपूर्ण देशभर या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला असून, पुढील काळात अहिंसक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी  पीयुष शाह,राजेश जैन,विकास अच्या, खुशालभाई शाह उपस्थित होते. न्यायालयाने याबाबत समाजाच्या व मंदिराच्या बाजूने भूमिका घेतली असतानाही पालिका मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे शनिवारी होत असलेल्या या जैन आक्रोश आंदोल...

शेतकऱ्यांच्या बांधावर आता " ए आय " येणार.....शेतीचा विकास होणार

Image
शेतकऱ्यांच्या बांधावर आता " ए आय "  येणार.....शेतीचा विकास होणार      महाराष्ट्र राज्य कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी मुंबई / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी )  कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणावरील मसुद्याबाबत सल्लामसलत करून राज्यातील कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी शासन आग्रही असल्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले. मंत्रालय येथे कृषी विभागाने कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणावरील मसुद्याबाबत सल्लामसलत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी बोलत होते. प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले की, केंद्र शासन आणि  महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग करण्यावर भर देत आहे. महाराष्ट्र शासनाने देखील हे धोरण अवलंबले आहे. या कार्यशाळेत २३ हून अधिक संस्था व ३५ हून अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते. यात मोठ्या व मध्...

मेघमल्हार चा भीमजयंती महोत्सव उत्साहात

Image
          मेघमल्हार चा भीमजयंती महोत्सव उत्साहात नवी मुंबई / रमेश औताडे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मेघ मल्हार संकुलात ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत चार दिवसीय भव्य भीमजयंती महोत्सव अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महोत्सवाची सुरुवात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती निमित्ताने लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या विशेष स्पर्धांनी झाली. यामध्ये चित्रकला, निबंधलेखन आणि प्रश्नमंजुषा यासारख्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला. "महात्मा फुले आणि बाबासाहेब - गुरु शिष्याचे नाते" या संकल्पनेवर आधारित चित्रकलेतून मुलांनी बाबासाहेबांचे विचार रंगवले, तर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक परिवर्तन" या विषयावर लिहिलेल्या निबंधांनी उपस्थितांची मने जिंकली. १२ एप्रिल रोजी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित नृत्य, नाटिका व प्रेरणादायी सादरीकरणे सादर करण्यात आली. लहानग्यांपासून युवकांपर्यंत प्रत्येक सादरीकरणात बाबासाहेबांवरील ...

हॉटेल -मोटेल थांबे रद्द करा .....एस टी प्रवासी महत्वाचा

Image
*प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या  हॉटेल -मोटेल थांबे रद्द करा!* -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश  मुंबई: (१६ एप्रिल २०२५ ) रमेश औताडे  लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री . प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.      लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल...

सरकारच्या आंधळ्या कारभारविरोधात आझाद मैदानात आंदोलन

Image
सरकारच्या आंधळ्या कारभारविरोधात आझाद मैदानात आंदोलन  मुंबई / रमेश औताडे  विविध फसव्या आर्थिक खाजगी गुंतवणूक जाहिराती पाहून गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आपली फसवणूक झाली की आंदोलन करतात. मात्र सरकारी यंत्रणेच्या सरकारी बाबूंच्या आंधळ्या  कारभारामुळे फसवणूक झाल्याने मुंबईत येऊन आझाद मैदानात आंदोलन करत न्याय मागणारे नागरिक आक्रमक झाल्याने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा आंधळा कारभार समोर आला आहे. मागील अधिवेशनात जमीन खरेदी विक्री व जमिनीचे प्रकार याबाबत बरीच चर्चा झाली. काही नवीन कायदे करण्यात आले. तर सामान्य माणसाला जमीन घेण्यासाठी घर दुकान बांधकाम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. मात्र सरकारी बाबू सरकारच्या अटी शर्ती न पाहता जो कारभार करत आहेत त्याचा फटका शेकडो जमीन खरेदी धारकांना बसला आहे. आपली सरकारकडूनच फसवणूक झाल्याने त्यांना मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करावे लागत आहे. चांडोली, खेड. जि. पुणे येथील जमीन गट नं १२६ मधील १ हेक्टर २४ आर क्षेत्र  २० ऑगस्ट २०२४ रोजी सरकार जमा करण्याचा आदेश  खेड च्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारित केला. अटी...

वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिजला विरोध

Image
              वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिजला विरोध मुंबई / रमेश औताडे  वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिज प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत जुहू येथील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणपूरक समुद्राखालील बोगद्याचा पर्याय सुचवला आहे. ‘जुहू बीच वाचवा’ मोहिमेअंतर्गत आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत उम्मेद नाहाटा, डॉ. हिमांशू मेहता, श्रीमती उषाबेन पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. डॉ. हिमांशू मेहता यांनी यावेळी सांगितले, “हा प्रकल्प जुहू बीचच्या नैसर्गिक सौंदर्याला हानी पोहोचवेल आणि पर्यावरणीय समतोल ढासळेल. दररोज लाखो पर्यटक या बीचला भेट देतात. त्यामुळे कोस्टल ब्रिजऐवजी समुद्राखालील बोगदा हा अधिक योग्य आणि शाश्वत पर्याय आहे.”या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी न्यायालयाने अधिक कागदपत्रांची मागणी केली होती, जी पूर्ण करून आता नव्याने याचिका सादर करण्यात आली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी सोशल मीडियावर जनजागृती, शांततामय रॅली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी य...