जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ अहिंसक आंदोलनाचा इशारा
जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ अहिंसक आंदोलनाचा इशारा
मुंबई विलेपार्ले येथील १९३५ साली बांधकाम केलेले १०८ पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगर पालिकेने तोडल्याने अखिल भारतीय सकल जैन समाज संतप्त झाला असून, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत " अहिंसक आंदोलन " करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण जैन यांनी सांगितले की, "अहिंसक आणि शांतताप्रिय जैन समाजाच्या श्रद्धास्थानांवर प्रशासनाने जाणूनबुजून केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र विरोध करतो. ही केवळ मुंबईतील नव्हे तर संपूर्ण देशातील जैन समाजाच्या श्रद्धेवर आघात आहे असे अनिल शाह यांनी सांगितले.
समाजाने संपूर्ण देशभर या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला असून, पुढील काळात अहिंसक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी पीयुष शाह,राजेश जैन,विकास अच्या, खुशालभाई शाह उपस्थित होते. न्यायालयाने याबाबत समाजाच्या व मंदिराच्या बाजूने भूमिका घेतली असतानाही पालिका मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे शनिवारी होत असलेल्या या जैन आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवाने सामील व्हावे असे आवाहन केले आहे. या आंदोलनात देशभरातील साधू संत राजकीय नेते सहभागी होणार आहेत.
Comments
Post a Comment