विश्व धरोहर दिवस २०२५ निमित्त ऑनलाईन सेमिनार
विश्व धरोहर दिवस २०२५ निमित्त ऑनलाईन सेमिनार
मुंबई / रमेश औताडे
विश्व धरोहर दिवस २०२५ च्या निमित्ताने उत्तर मध्य रेल्वे मुख्यालयात एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आला. या सेमिनारच्या अध्यक्षस्थानी महाप्रबंधक उपेंद्र चंद्र जोशी होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोलापूर येथील डॉ. वेंकटेश पगार यांनी ‘हेरिटेज’ अर्थात वारसा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या वेळी देशभरातील रेल्वेच्या धरोहर स्थळांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. लोकांमध्ये प्राचीन वारसा जपण्याचे महत्त्व पटवून देणे हा या सेमिनारचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात अनीष सिन्हा (पीसीएमई), अमित मालवी (वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी), मुख्यालय व मंडळातील इतर अधिकारी, सुपरवायझर ट्रेनिंग सेंटर, झाशी येथील सर्व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. एकूण २०० लोकांनी या सेमिनारमध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमाअंतर्गत शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण व गृह व्यवस्थापनावरील मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.
Comments
Post a Comment