सरकारच्या आंधळ्या कारभारविरोधात आझाद मैदानात आंदोलन
सरकारच्या आंधळ्या कारभारविरोधात आझाद मैदानात आंदोलन
मुंबई / रमेश औताडे
विविध फसव्या आर्थिक खाजगी गुंतवणूक जाहिराती पाहून गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आपली फसवणूक झाली की आंदोलन करतात. मात्र सरकारी यंत्रणेच्या सरकारी बाबूंच्या आंधळ्या कारभारामुळे फसवणूक झाल्याने मुंबईत येऊन आझाद मैदानात आंदोलन करत न्याय मागणारे नागरिक आक्रमक झाल्याने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेचा आंधळा कारभार समोर आला आहे.
मागील अधिवेशनात जमीन खरेदी विक्री व जमिनीचे प्रकार याबाबत बरीच चर्चा झाली. काही नवीन कायदे करण्यात आले. तर सामान्य माणसाला जमीन घेण्यासाठी घर दुकान बांधकाम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. मात्र सरकारी बाबू सरकारच्या अटी शर्ती न पाहता जो कारभार करत आहेत त्याचा फटका शेकडो जमीन खरेदी धारकांना बसला आहे. आपली सरकारकडूनच फसवणूक झाल्याने त्यांना मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करावे लागत आहे.
चांडोली, खेड. जि. पुणे येथील जमीन गट नं १२६ मधील १ हेक्टर २४ आर क्षेत्र २० ऑगस्ट २०२४ रोजी सरकार जमा करण्याचा आदेश खेड च्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारित केला. अटी शर्ती चा भंग तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी म्हणजेच शासनाने केला असल्याने त्याची शिक्षा जमीन खरेदी धारकांना का ? हा कोणता न्याय ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान केला आहे.
यापूर्वी याच मागणीसाठी पुणे येथे आंदोलन केले त्यावेळी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आम्हाला दहा दिवसात न्याय देण्याचे आश्वासन दिले . मात्र न्याय न मिळाल्याने पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. उपविभागीय अधिकारी खेड यांच्याकडून अहवाल घेत न्याय दिला जाईल असे त्यांनी सांगितले होते. तेव्हा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
भोगावटा २ वर्ग, महार वतनाची जमीन जिल्हाधिकारी पुणे कुळकायदा शाखेची रितसर परवानगी घेऊनच हे व्यवहार झाले होते. भोगावटादार वर्ग १ मध्ये जमीन रूपांतरित झाल्याने नागरिकांनी जमीन खरेदी केली. काहींनी घराची बांधकामे सुरू केली आहेत. मात्र अटी शर्ती भंग झाल्याचा दावा करून एका व्यक्तीने तक्रार केली असता आता आम्हाला भुर्दंड सोसावा लागत असून आंदोलन करावे लागत आहे असे टाव्हरे यांनी सांगितले.
पत्रकार परिषद घेत अशोकराव टाव्हरे यांनी दिली माहिती
Comments
Post a Comment