Posts

अभिनेता बॉबी देओलला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

Image
अभिनेता बॉबी देओलला पाहण्यासाठी  प्रचंड गर्दी  मुंबई / रमेश औताडे  कल्याण ज्वेलर्स या ज्वेलरी ब्रँडने  पनवेलमध्ये आपल्या नवीन शोरूम्सचे बॉलीवूड स्टार बॉबी देओल याच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन केले त्यावेळी प्रचंड गर्दी झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथील हे नवीन महाराष्ट्रातील २१ वे शोरूम आहे.  उत्कृष्ट दागिन्यांच्या कलेक्शनपासून विस्तृत डिझाईन्स येथे उपलब्ध आहेत. रविवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास बॉबी देओल यांचे पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कल्याण ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये आगमन झाले संपूर्ण चौकात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.  कल्याण ज्वेलर्सबद्दल चाहत्यांना बॉबी देओल यांनी सांगितले कि,"कल्याण ज्वेलर्स खूप वर्ष अगोदर पासून उत्कृष्ट काम करीत आहे. आणि त्यांची पारंपरिक दागिने सर्व लोकांना फार आवडतात. रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,“आमच्या आजवरच्या प्रवासात आम्ही उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत आणि ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.  कल्याण...

प्रगतिशील उद्योगपतींनीच भारतीयउद्योजकतेचा पाया रचला- कुमार केतकर

Image
प्रगतिशील उद्योगपतींनीच भारतीय उद्योजकतेचा पाया रचला- कुमार केतकर मुंबई / पी आर न्यूज  प्रगत विचारसरणीच्या सामाजिक भान असलेल्या उद्योगपतींनी आपल्या विचारसरणीवर ठाम राहात भारतीय उद्योजकतेचा पाया रचला, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांनी मुंबईत केलं. ‘यांत्रिकाच्या सावल्या’ या प्रज्ञा जांभेकर लिखित आणि सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित पुस्तकाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या पुस्तकाची प्रस्तावना त्यांनीच लिहिली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाचे माजी महाव्यवस्थापक आणि त्यांचे पहिले इंजीनिअर शंभोराव जांभेकर, त्यांच्या पत्नी गंगाबाई, त्यांचे चिरंजीव आणि कम्युनिस्ट नेते आणि संपादक रामकृष्ण जांभेकर तसंच त्यांच्या पत्नी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या महिला सदस्य सुहासिनी जांभेकर यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विनय हर्डीकर तसंच सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आर्थिक विकासातून सामाजिक योगदान देणं हे दुर्मीळ असून महिंद्र...

पद्मश्री ढसाळ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण यांची निवड

Image
पद्मश्री ढसाळ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण यांची निवड मुंबई / रमेश औताडे  कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होत असलेल्या विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण यांची निवड केल्याचे साहित्य संमेलनाचे निमंत्रक लेखक कवी अशोकराव टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले स्मृती साहित्य संमेलन  कनेरसर येथे पार पडले होते. दुसरे साहित्य संमेलन स्वर्गीय नामदेवराव ढसाळ यांचे कर्मभुमीत होत आहे. राजगुरूनगर येथे झालेल्या बैठकीस ज्येष्ठ साहित्यिक ॲड. प्रकाश शितोळे,कुलस्वामिनी साहित्य परिषदेचे पदाधिकारी राजुशेठ खंडीझोड,गोपीनाथ लोखंडे,संदीप म्हसुडगे,राजेंद्र शिंदे,विजय कानवडे,ज्ञानेश्वर साबळे, कुमार गायकवाड,सुरेखा टाव्हरे हे उपस्थित होते. साहित्य संमेलनास भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे साहित्यनगरी असे नाव देणार असल्याचे त्यांचे वंशज गोपीनाथ लोखंडे म्हणाले. मुंबई येथे होत असलेले साहित्य संमेलन दर्...

भारतातील पहिली संकल्पना गाडगेबाबांच्या धर्मशाळेत

Image
भारतातील पहिली संकल्पना गाडगेबाबांच्या धर्मशाळेत मुंबई / रमेश औताडे  ज्या गोरगरीब रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची वेळ येत होती त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय त्या वेळी श्री संत गाडगे महाराजांनी ओळखून जी धर्मशाळा उभी केली त्या धर्मशाळा वास्तूचे आता लवकरच नऊ मजल्यात रूपांतर होणार असून रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकांच्या राहण्याची सोय इथे केली जाणार आहे. भारतातील हि पहिली संकल्पना असणार आहे. अशी माहिती श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत यांनी दिली. मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयासमोर असणारी ही धर्मशाळा आता ४५ रूम असणारी नवीन इमारत होणार आहे. त्याच्या बेसमेंटला रुग्णवाहिका पार्किंग करण्याची जागा ठेवली जाणार आहे. शिवाय रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकाच्या राहण्याची सोय केली जाईल. या धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० रुपयांत राहण्याची सोय उपलब्ध होते. दोन वेळचे शिजवलेले अन्नदेखील मिळते. झोपण्यासाठी अंथरुण, पांघरूण आणि खाटदेखील दिली जाते. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराची सुविधा देण्यात आली आहे. ही सर्व सुविधा फक्त ५० रुपय...

प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचा सन्मान

Image
प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचा सन्मान पी आर न्यूज / मुंबई कलर्स मराठीवर 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका चांगलीच गाजतेय. गेली ५ वर्ष ही मालिका अखंडपणे सुरु आहे. मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे बाळूमामांची प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्या हस्ते प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचा सन्मान करण्यात आला.  जगन्नाथ सहकारी पतसंस्थेच्या ३९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष राजेंद्र मोहिते, संगीत नाट्य कलावंत अमोल बावडेकर, मिमिक्री कलाकार दिलीप खन्ना, उद्योजक दिलीप कामेरकर आणि सहकार क्षेत्रातली अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. पतसंस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.  "नानाच्या नानाची टांग" हे प्रमोद पवार यांची प्रमुख भूमिका असलेले नाटक यावेळी सादर करण्यात आले.

मुंबईत फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प चे दोन दिवस आयोजन

Image
मुंबईत फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प चे दोन दिवस आयोजन पी आर न्यूज / मुंबई रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीने आयोजित केलेल्या प्रमुख प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प'चे आयोजन 11 आणि 12 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर फिनिक्स टॉवर्ससमोरील, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथे सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत होणार आहे. या उपक्रमाचे हे 16 वे वर्ष आहे. मागील 15 शिबिरांमध्ये प्रत्येकी 3 हजारांहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे.अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी पत्रकार संघात दिली. यावेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीचे  डॉ. अरुणकुमार गुप्ता,विनय खंडेलवाल,इत्यादी उपस्थित होते. या वर्षी शिबिरात पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल, सर एचएन रिलायन्स हॉस्पिटल, कमलादेवी गौरीदत्त मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, कॅन्सर पेशंट असिस्टन्स असोसिएशन, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया, कैवल्य धाम यांसारख्या अग्रगण्य वैद्यकीय संस्थांचे डॉक्टर सहभागी होणार आहेत. नेत्र, दंत, दमा, ऑर्थोपेडिक,कान नाक घसा, हृदयरोग, कर्करोग, रक्त आणि मधुमेह त...

जगभरात घुमला तुतारी चा आवाज

Image
जगभरात तुतरीचा आवाज घुमवणारे आंतरराष्ट्रीय तुतारी वादक पांडुरंग गुरव यांनी रचला तुतारी वर  पोवाडा मुंबई / रमेश औताडे   ' एक तुतारी द्या मज आणुनी.... फुंकिन जी मी स्वप्राणाने... भेदून टाकीन सगळी गगणे....दीर्घ तिच्या त्या किंकाळीने....अशी तुतारी द्या मज आणुनी.   ही कविवर्य केशवसुतांची कविता ऐकली की प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी तुतारी वाजवण्याचा मोह निर्माण होतो. अशा या तुतरीचा स्वर अमेरिका , मॉरिशस ,जपान , दुबई  या  व इतर देशात पोहचवला ते सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे पांडुरंग शंकर गुरव आज महाराष्ट्रात अनेक महाविद्यालयात विविध सण समारंभ मध्ये पुरातन काळापासून चालत आलेली तुतारी ची कला जिवंत राहावी म्हणून जनजागृती करत आहेत. आंतरराष्ट्रिय स्तरावरील तुतारी वादक पांडुरंग गुरव यांनी आता तुतरिवर पोवाडा रचला आहे. सांताक्रुज येथील पाठक गाला महाविद्यालयात २०१५ पासून गुरव हे विद्यार्थ्यांना तुतरीची कला शिकवत आहेत. प्रत्येक वर्षी ३० ते ४० मुलांची तुकडी ही तुतारी कला शिकत असतात . महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मिता पठाडे, प्राध्यापक नेत्रा ठाकरे, प्रशांत क...