प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचा सन्मान
प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचा सन्मान
पी आर न्यूज / मुंबई
कलर्स मराठीवर 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका चांगलीच गाजतेय. गेली ५ वर्ष ही मालिका अखंडपणे सुरु आहे. मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे बाळूमामांची प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्या हस्ते प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचा सन्मान करण्यात आला.
जगन्नाथ सहकारी पतसंस्थेच्या ३९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष राजेंद्र मोहिते, संगीत नाट्य कलावंत अमोल बावडेकर, मिमिक्री कलाकार दिलीप खन्ना, उद्योजक दिलीप कामेरकर आणि सहकार क्षेत्रातली अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. पतसंस्थेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. "नानाच्या नानाची टांग" हे प्रमोद पवार यांची प्रमुख भूमिका असलेले नाटक यावेळी सादर करण्यात आले.
Comments
Post a Comment