मुंबईत फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प चे दोन दिवस आयोजन

मुंबईत फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प चे दोन दिवस आयोजन


पी आर न्यूज / मुंबई

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीने आयोजित केलेल्या प्रमुख प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'फिनिक्स मेगा मेडिकल कॅम्प'चे आयोजन 11 आणि 12 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर फिनिक्स टॉवर्ससमोरील, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथे सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत होणार आहे.

या उपक्रमाचे हे 16 वे वर्ष आहे. मागील 15 शिबिरांमध्ये प्रत्येकी 3 हजारांहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे.अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी पत्रकार संघात दिली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटीचे 
डॉ. अरुणकुमार गुप्ता,विनय खंडेलवाल,इत्यादी उपस्थित होते. या वर्षी शिबिरात पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल, सर एचएन रिलायन्स हॉस्पिटल, कमलादेवी गौरीदत्त मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, कॅन्सर पेशंट असिस्टन्स असोसिएशन, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया, कैवल्य धाम यांसारख्या अग्रगण्य वैद्यकीय संस्थांचे डॉक्टर सहभागी होणार आहेत.

नेत्र, दंत, दमा, ऑर्थोपेडिक,कान नाक घसा, हृदयरोग, कर्करोग, रक्त आणि मधुमेह तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक तपासणी, सल्ला आणि औषधांचे मोफत वाटप, सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध.योग प्रात्यक्षिके व सल्लामसलत,मोफत ECG तपासणी केली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी व्यापक प्रचार केला गेला आहे.75 बॅनर लावण्यात आले आहेत. 22 हजार हँडबिल्सचे वाटप,25 वृत्तपत्रांमध्ये शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करणारे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 नियामक मंडळाने या उपक्रमाला सर्वोत्कृष्ट सामुदायिक सेवा उपक्रमांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. स्थानिक नगरपालिका प्रभाग, नगरसेवक, आमदार आणि पोलिस स्टेशनकडून या शिबिराला पाठिंबा मिळाला आहे.अशी माहिती अजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा