अभिनेता बॉबी देओलला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

अभिनेता बॉबी देओलला पाहण्यासाठी  प्रचंड गर्दी 


मुंबई / रमेश औताडे 

कल्याण ज्वेलर्स या ज्वेलरी ब्रँडने  पनवेलमध्ये आपल्या नवीन शोरूम्सचे बॉलीवूड स्टार बॉबी देओल याच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन केले त्यावेळी प्रचंड गर्दी झाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथील हे नवीन महाराष्ट्रातील २१ वे शोरूम आहे. 

उत्कृष्ट दागिन्यांच्या कलेक्शनपासून विस्तृत डिझाईन्स येथे उपलब्ध आहेत. रविवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास बॉबी देओल यांचे पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कल्याण ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये आगमन झाले संपूर्ण चौकात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. 

कल्याण ज्वेलर्सबद्दल चाहत्यांना बॉबी देओल यांनी सांगितले कि,"कल्याण ज्वेलर्स खूप वर्ष अगोदर पासून उत्कृष्ट काम करीत आहे. आणि त्यांची पारंपरिक दागिने सर्व लोकांना फार आवडतात. रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,“आमच्या आजवरच्या प्रवासात आम्ही उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत आणि ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. 

कल्याण ज्वेलर्सने अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर चांगल्या बचतीचा आनंद घेण्याची संधी मिळते. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून, ग्राहकांना साध्या सोन्याचे दागिने आणि डायमंड जडलेल्या दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सूट मिळू शकेल.

 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन