जुनी पेन्शनसाठी शरद पवारांना निवेदन;


जुनी पेन्शनसाठी शरद पवारांना निवेदन; 

मुंबईत सविस्तर चर्चेसाठी भेटीचे आश्वासन


मुंबई / रमेश औताडे 

शिरदवाड येथे राज्याध्यक्ष विजय शिरोळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट; १९८२ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या


कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड येथे माजी आमदार कै. दत्ताजीराव कदम यांच्या शतकपूर्ती कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन १९८२ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी मुंबई येथे स्वतंत्र भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची विनंती करण्यात आली असून पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

शिरदवाड येथे आयोजित कै. दत्ताजीराव कदम यांच्या शतकपूर्ती कार्यक्रमासाठी शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष विजयजी शिरोळकर, राज्य सहसचिव सुनील कांबळे, बनसोडे सर, अदुरे सर तसेच किरणकुमार कोळी यांनी पवार यांची भेट घेतली.

शिष्टमंडळाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील विविध मागण्या मांडत निवेदन सादर केले. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जुनी पेन्शन योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी मुंबई येथे स्वतंत्र वेळ देण्याची विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत भेटीसाठी होकार दर्शविल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या भेटीमुळे जुनी पेन्शन योजनेसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात या मागणीसाठी पाठपुरावा अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री