महसूलमंत्र्यांच्या दारात " न्याय द्या " आंदोलनाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे

मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेने आता थेट महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

बिगर सातबारा शेतकरी, भूमिहीन कष्टकरी आणि विविध महसुली प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. आझाद मैदानावर आंदोलने, निवेदने आणि बैठका घेऊनही प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची दिशा बदलून थेट महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी दिला आहे.

राज्यातील हजारो बिगर सातबारा शेतकरी जमीन हक्क, नोंदी दुरुस्ती, वारसा नोंद, मालकी हक्क आणि इतर महसुली प्रश्नांमुळे अडचणीत आहेत. या समस्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

महसूल विभागाने संबंधित प्रश्नांवर ठोस भूमिका जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच आगामी आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश