बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांची मागणी


मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात इंगळे यांनी दावा केला की, अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाबाबत विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात आला असून अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यांनी असेही म्हटले की, या विषयावर संसद आणि विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याचे सांगितले जात असले तरी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्टता दिसून येत नाही.

इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी  अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकृत ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. "जर पक्षाच्या नेत्यांना या विषयावर ठोस भूमिका घेता येत नसेल, तर त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा राजकीय वापर टाळावा," असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच, संबंधित प्रकरणात शासन आणि प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. या विषयावर समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास बारामती तालुक्यातील गोजेबुव येथे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री