कामगार मंत्र्यांकडून सत्कार करीत कामाचे कौतुक


मुंबई / रमेश औताडे 

राज्य शासनाने 150 दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये 3 हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात 200 गुणांपैकी 185 गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे.

 कार्यालयीन मूल्यमापनात 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील 68 सर्वोत्तम आयुक्त, संचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके संचालनालयाने 4 था आणि कामगार आयुक्तालयाने 5 वा क्रमांक पटकाविला आहे.  विभागाच्या या  उल्लेखनिय कामगिरीबद्दल कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दालनात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सत्कार करीत त्यांच्या कामाचे कौतुक केले. 
यावेळी अधिकाऱ्यांनीही विभागप्रमुख म्हणून कामगार मंत्री यांचा सत्कार केला. याप्रसंगी कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव दिपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव रोशनी कदम, बाष्पके संचालनालयाचे संचालक  गजानन वानखडे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा