ग्राहकांची ऑनलाईन तक्रार प्रक्रिया ठप्प



मुंबई / रमेश औताडे 

कंज्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित स्वयंसेवी संस्थेची ग्राहकांसाठीची हेल्पलाईन सेवा सध्या खंडित झाल्याने नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदवता येत नाही. या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

या संस्थे मार्फत मार्फत ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यावर मार्गदर्शन करणे तसेच योग्य ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. मात्र हेल्पलाईन व ऑनलाईन तक्रार प्रणाली बंद असल्याने अनेक ग्राहकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. यासंदर्भात संस्थेचे कर्मचारी तुकाराम पवार यांनी सरकारकडे  मागणी केली असून, ग्राहक हित लक्षात घेता ही हेल्पलाईन सेवा तातडीने सुरू करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. 

ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून, ती दीर्घकाळ बंद राहणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने याची दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर करून संस्थेची हेल्पलाईन व ऑनलाईन तक्रार सेवा लवकरात लवकर कार्यान्वित करावी अशी मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री