कै. प्रा.थोरात स्मृती व्याख्यानमालेत 13 वे पुष्प महाराष्ट्र भूषण पद्मश्री मा.डॉ.अभय बंग गुंफणार
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
नवी मुंबईमध्ये एकमेव असणाऱ्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा यज्ञ अखंड सुरू आहे. यामध्ये 2025 यावर्षी महाराष्ट्र भूषण पद्मश्री मा.डॉ.अभय बंग यांचे व्याख्यान विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे रविवार दि 7 डिसेंबर 2025 सकाळी 10 वा संपन्न होणार आहे.
प्रभात ट्रस्ट हा सन 2011 पासून नवी मुंबईमध्ये कार्यरत असणाऱ्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गत 12 वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेचे अजीव सदस्य कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृतीव्याख्यान आयोजित करण्यात येते या श्रृंखलेमध्ये प्रा. प्रवीण दवणे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, विडंबन कवी रामदास फुटाणे, हॉटेल व उद्योग मार्गदर्शक डॉ. विठ्ठल कामत, रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ.भरत वाटवानी, पद्मश्री डॉ. रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, दीपस्तंभ चे यजुवेंद्र महाजन, डॉ नरेंद्र जाधव इत्यादी मान्यवरांनी या व्यासपीठावरून समाजप्रबोधनाची ज्योत प्रज्वलित ठेवली आहे.
ZTCC मुंबई संलग्न संस्था प्रभात ट्रस्ट अवयवादान प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहे. यासाठी स्मृतीव्याख्यान कार्यक्रमामध्ये सन 2025 सालातील देशातील पहिले अवयवदाता, कोपरखैरणे येथील कै.देवानंद मोहन शिंदे( देबू) यांच्या परिवारास अवयवदाता सन्मान तसेच अवयदान क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी नवी मुंबईतील दोस्त मुंबई संस्थेचे संस्थापक डॉ. कैलास जवादे यांना स्टार ऑफ द इयर सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृतीग्रंथालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सीकेटी कॉलेज न्यू पनवेल चे ग्रंथपाल डॉ.रमाकांत अमर नवघरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यासाठी तुला संपन्न होणार आहे. संकल्प तुला दानाचा सामाजिक परिवर्तनाचा या उपक्रमांतर्गत डॉ. अभय बंग यांची स्वलिखित पुस्तकांद्वारे ग्रंथ तुला करण्यात येणार आहे. यामधून प्राप्त पुस्तके ग्रंथालय, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांना मोफत वितरित करण्यात येणार आहेत. प्रभात संस्थेच्या कार्याची माहिती देणारी प्रभात दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
अवयवादानाची जनजागृती करण्यासाठी अवयवदाता दूत या विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये क्यू आर कोड च्या माध्यमातून करावयाचे अवयदान संकल्प त्याची प्रात्यक्षिक, पथनाट्य, तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केलेले आहे.
या ठिकाणी बाबा आमटे यांच्या आनंदवन व प्रभात महिला बचत गट हस्त निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी सामाजिक, राजकीय तसेच विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी सदर वृत्तास आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी द्यावी व सामाजिक संदेश देण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती. अधिक माहितीसाठी संपर्क 9869432224 करावा.
पुरस्काराबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी येथील कै.देवानंद मोहन शिंदे( देबू) यांच्या साठी पत्नी स्वप्नजा शिंदे 9323575137 डॉ. कैलास जवादे 9987889390 डॉ.रमाकांत अमर नवघरे 9324564183 संपर्क करावा.
स्मृती व्याख्यान संयोजन समिती चे मुख्य डॉ. प्रशांत भा.थोरात यांनी याबाबत माहिती दिली.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
वरिष्ठ संपादक रमेश औताडे
7021777291
.
Comments
Post a Comment