इलेक्ट्रोपॅथीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे आवाहन



इलेक्ट्रोपॅथीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे आवाहन
मुंबई / रमेश औताडे 

देशभरात परवडणाऱ्या आणि पर्यायी आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी इलेक्ट्रोपॅथी उपचार पद्धतीला राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर मान्यता द्यावी, असे आवाहन ई-बायो केअर्सचे संस्थापक डॉ. जसविंदर सिंग यांनी केंद्र सरकारला केले.

मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राजस्थान सरकारने १ मे २०२५ पासून राज्य इलेक्ट्रोपॅथी मंडळ स्थापन करून या उपचार पद्धतीला कायदेशीर मान्यता दिली आहे. उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशातही अशा प्रयत्नांना गती मिळत आहे.

ऑटिझम, स्पीच डिसऑर्डर आणि सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांवर हर्बल व फ्लॉवर थेरपीद्वारे उपचार करून डॉ. सिंग यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. अ‍ॅलोपॅथीत असाध्य ठरणाऱ्या आजारांसाठी इलेक्ट्रोपॅथी आशेचा किरण ठरू शकते. त्यामुळे केंद्रानेही राजस्थान मॉडेल स्वीकारून ही व्यवस्था देशभरात लागू करावी, असे त्यांनी सांगितले.





Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा