महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांच्या अस्मितेला नवा रंग

         महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांच्या अस्मितेला नवा रंग
मुंबई / रमेश औताडे 

कामगार दिनाच्या साक्षीने महाराष्ट्रातील हजारो सुरक्षा रक्षकांना आता एक नवी ओळख, एक नवा सन्मान मिळाला. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश परिधान करण्याची शासन मान्यता मिळाली आहे.

ही केवळ गणवेशातील रंगांची अदलाबदल नाही, तर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेला स्वाभिमानाचा रंग आहे. सुरक्षा रक्षकांच्या खाकी वर्दी मागणीसाठी झटणाऱ्या विविध संघटना, खास करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला अखेर यश आले आहे.

कामगार मंत्री आकाश फुडकर यांच्या हस्ते खाकी गणवेशाचे अनावरण झाले. यावेळी कामगार आयुक्त एस. पी. तुमोड, सहायक आयुक्त लोखंडे , सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके, सचिव गौरव नालींदे,  उपस्थित होते.

खाकी रंगाचा गणवेश  हा आता केवळ पोलीस किंवा सैनिकांचा नाही, तर सुरक्षा देणाऱ्या "सामान्य सुरक्षा रक्षकांचा असामान्य सन्मान" आहे असे लक्ष्मणराव भोसले यांनी सांगितले.






Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री