Posts

Maharashtra’s Dahi Handi Gets an International Digital Platform

Image
Mumbai / Ramesh Autade Maharashtra’s Dahi Handi tradition is set to gain a major international digital platform as the highly anticipated "Pro Govinda League Season 4"—a Dahi Handi sports festival—will be broadcast live on Jio Hotstar for the first time this year. Audiences across the globe will be able to experience the thrill of this competition. This announcement was made by Purvesh Sarnaik, President of the Pro Govinda League. The announcement for Pro Govinda Season 4 was made after seeking blessings from Lord Siddhivinayak. The thrilling event is scheduled to take place on August 25, 26, and 27. In the presence of Lord Siddhivinayak, Purvesh Sarnaik unveiled and publicly introduced the league's official mascot, 'Bittu Boss'. 'Bittu Boss' is not merely the league's mascot; there is an emotional memory attached to it. Years ago, Sarnaik had adopted a young leopard named 'Bittu Boss' from the Sanjay Gandhi National Park. The offic...

दिल्लीला धडक देणार ! मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट नंतर 'दिल्ली बंद ' चा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Image
मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी  ( रमेश औताडे ) मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ९ ऑगस्टपर्यंत वाट पाहणार, अन्यथा आंदोलन करून मुंबईसारखी दिल्लीही बंद पाडून आरक्षण मिळवणारच, असा आक्रमक इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेत बोलताना केरे पाटील म्हणाले की, मराठा समाज गेल्या ३५ वर्षांपासून आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. यापूर्वी मुंबई बंद केली तेव्हा सरकारने आश्वासन दिले होते, त्यामुळे समाजाने गुलाल उधळून आनंद साजरा केला. मात्र, तो आनंद फार काळ टिकला नाही. महाराष्ट्र सरकार जे काही आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, ते न्यायालयात टिकत नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारकडे आणि दिल्लीत धडक दिल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जीवाचे रान करून मुंबई बंद पाडली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर, आता केवळ महाराष्ट्रात सीमित न राहता दिल्लीतील जंतर-मंतर येथे तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा निर्धारही रमेश केरे पाटील यांनी व्यक्त केला. पी ...

गृहनिर्माण संस्थेच्या थकित भाड्यासाठी सचिन लोंढे आक्रमक

Image
मुंबई / रमेश औताडे  जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिव सुदर्शन गृहनिर्माण संस्थेच्या (ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) पुनर्वसन प्रकल्पाबाबत अखेर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. ओमकार बिल्डर्सवर रहिवाशांचे तब्बल १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून, हे थकीत भाडे तात्काळ मिळावे आणि रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) वतीने जोगेश्वरी तालुकाध्यक्ष सचिन आदिनाथ लोंढे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला. या रखडलेल्या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगरसेवक अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्ससह इतर रखडलेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार बिल्डर्सकडे सुमारे १३३ कोटी रुपयांचे भा...

वृद्ध आजारी कलावंतांचे मानधन त्वरित जमा करण्याची मागणी

Image
मुंबई / रमेश औताडे  राजश्री शाहू महाराज साहित्यिक वृद्ध कलावंत मानधन योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या अनेक कलाकारांचे मानधन तातडीने खात्यात जमा करण्यात यावे, अशी  मागणी 'ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई' च्या वतीने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले,  मुंबई उपनगरातील कलाकारांच्या मानधनाच्या दोन याद्या सांस्कृतिक कला संचालनालयाकडे पाठवून दीड महिना उलटला आहे. पहिल्या यादीतील काही कलाकारांचे हप्ते जमा झाले असले, तरी तांत्रिक अडचणींच्या कारणास्तव बहुतांश कलाकार अजूनही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, नांदेड व लातूर येथील अनेक गरीब आणि आजारी लोककलावंत गेल्या काही वर्षांपासून या मदतीची वाट पाहत आहेत. या समस्येसह असोसिएशनने शासनाकडे विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रलंबित मानधन वेळेवर जमा करणे, लोककलावंत बोर्डाची स्थापना करणे, दर ५ वर्षांनी सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, आणि कलावंतांना नियमित मानधनासोबत आरोग्य व...

टपाल व्यवस्थेत क्रांती घडवणारे पिनकोडचे जनक : श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर

Image
     *प्रा. हेमंत सुधाकर सामंत*  भारतातील टपाल व्यवस्थेचा इतिहास हा केवळ पत्रव्यवहाराचा इतिहास नसून देशाला एका अदृश्य धाग्यात बांधून ठेवणार्‍या व्यवस्थेचा इतिहास आहे. या व्यवस्थेला आधुनिक, वैज्ञानिक आणि अधिक कार्यक्षम बनविण्याचे श्रेय ज्या व्यक्तीला दिले जाते, ते म्हणजे ‘श्री. श्रीराम भिकाजी वेलणकर’. भारतातील पिनकोड (Postal Index Number – PIN) प्रणालीचे जनक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.  त्यांच्या एका दूरदृष्टी पूर्ण कल्पनेमुळे भारतासारख्या विशाल देशातील टपाल वितरणाची संपूर्ण पद्धत बदलली. आज आधार कार्ड, बँकिंग, ई-कॉमर्स, जीएसटी, सरकारी कागदपत्रे, कुरिअर सेवा आणि ऑनलाइन खरेदीपासून ते ग्रामीण भागातील पत्रव्यवहारापर्यंत प्रत्येक क्षेत्रात पिनकोड हा अपरिहार्य घटक बनला आहे.  श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा जन्म ४ एप्रिल १९२६ रोजी महाराष्ट्रातील एका सुशिक्षित कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना शिस्त, नियोजन, अभ्यासू वृत्ती आणि सार्वजनिक सेवेमध्ये विशेष रस होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय टपाल सेवेत अधिकारी म्हणून प्रवेश केला. त्यांच्...

मग प्रशासनाला वेतन भत्ते कशासाठी !

Image
अनधिकृत बांधकामाविरोधात नागरिक तक्रार करतात  मग प्रशासनाला वेतन भत्ते कशासाठी ! दक्ष नागरिक समितीचा सवाल मुंबई / रमेश औताडे  अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन प्रशासन जाहीर प्रसिद्धी करते. अनधिकृत बांधकाम सुरू असताना महानगरपालिका अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, नगररचना विभाग, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणेतील अधिकारी कामगार काय काम करते ? त्यांना वेतन भत्ते कशासाठी दिले जातात ? नागरिकांना पुढे करून त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्यात अधिकारी आनंद घेत आहेत का ? असे अनेक प्रश दक्ष नागरिक समितीने केले आहेत. अनधिकृत बांधकामे एका रात्रीत उभी राहत नाहीत. अनेक दिवस, अनेक महिने सुरू असलेल्या या कामांकडे संबंधित विभागांचे अधिकारी दुर्लक्ष कसे करतात? बांधकाम सुरू असतानाच ते थांबविण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना ती जबाबदारी नागरिकांवर का ढकलली जाते, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून समितीचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केला आहे. प्रत्यक्षात तक्रार करणाऱ्या नागरिकांनाच अनेकदा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून धमक्या, शिवीगाळ...

मातंग समाजाची " लहू बंधन " मोहिमेतून क्रांतीची सुरुवात

Image
मुंबई / रमेश औताडे  महामानव लहुजी उस्ताद साळवे आणि पिवळा रंग हे समीकरण म्हणजे या महामानवाची निशाणी आहे. तोच धागा पकडत लहुजी वस्ताद यांची निशाणी म्हणून " लहू बंधन " सर्व समाज बांधवांच्या हातात बांधण्याचा संकल्प साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने झाल्याने  एका नवीन पर्वाची सुरवात झाली आहे. असे मत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात व्यक्त केले. अनेक लोक वेगवेगळ्या देवा धर्माच्या नावाने  वेगवेगळ्या रंगाचे बंधन बांधतात. पिवळे बंधन हे मातंग समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरेल असा संकल्प करत समाज बांधव संदीप नामवाड, संतोष थोरात, बाबुराव मुखेडकर यांनी राज्यभर समाज बांधवांच्या हातात हे पिवळे बंधन बांधून समाजाला एकत्र आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या बंधनांमुळे  समाज बांधवांमध्ये एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण होईल. सकल मातंग समाज च्या वतीने पुढील महिन्यात २९ सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. अंदोलनात सहभागी होण्यासाठी हे ल...