देशभरातील सर्व २७ लाख वीज कामगार एक तास संपावर
देशभरातील सर्व २७ लाख वीज कामगार एक तास संपावर मुंबई / रमेश औताडे वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा सरकारने जो मनमानी प्रयत्न सुरू केला आहे त्या विरोधात देशभरातील सर्व २७ लाख वीज कामगार ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत एक तास काम बंद आंदोलन करणार आहेत. अशी माहिती ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज चे सरचिटणीस मोहन शर्मा व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. " पेन डाउन-टूल डाऊन-काम बहिष्कार " असे या आंदोलनाचे नाव ठेवले असून एक तास काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. वीज ग्राहकांचे व कामगारांचे मोठे नुकसान करण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने तरीही मनमानी कारभार करत खाजगीकरण केले तर मग पुढे काय करायचे त्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेणार असा इशाराही दिला आहे.