मुंबईत भरणार अल्पसंख्यांक बौद्ध धम्म परिषद
मुंबईत भरणार अल्पसंख्यांक बौद्ध धम्म परिषद
मुंबई / रमेश औताडे
भारत सरकारने बौद्ध समाजाचा अल्पसंख्याक वर्गात समावेश केला असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बौद्ध धम्म आणि समाजाचे देशभरातील सर्वांगीण प्रश्न सोडवण्यासाठी येत्या ५ जानेवारी रोजी बौद्ध अल्पसंख्यांक परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया बुद्धिस्ट मायनॉरिटी फेडरेशनचे सरचिटणीस इंद्रजीत मोहिते यांनी दिली आहे.
या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया बुद्धिस्ट मायनॉरिटी फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप असणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे बौद्ध विचारवंत नेते अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. रमेश बनकर आमदाबाद, अभयारत्न बौद्ध दिल्ली बुद्धगया, सतवीर बौद्ध पलवाल हरियाणा, आशिष बरुआ दिल्ली, संजय शिंदे जिल्हा नियोजन अधिकारी मुंबई, दिलीप चौरे, मुंबई जिल्हा नियोजन अधिकारी, दिल्ली अल्पसंख्यांक मंत्रालयाचे सचिव आदी उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती ऑल इंडिया बुद्धिस्ट मायनॉरिटी फेडरेशन आणि महाबोधी फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात आली आहे. या परिषदेला मोठ्या संख्येने बौद्ध धम्म बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत जगताप यांनी पत्रकान्वये केले आहे.
Comments
Post a Comment