युवक नेते अमित साळुंखे धनुष्यबाण घेवून शिवसेनेत प्रवेश

युवक नेते अमित साळुंखे धनुष्यबाण घेवून शिवसेनेत प्रवेश


मुंबई / रमेश औताडे 


उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत मागासवर्गीय नेते अमित साळुंखे यांनी प्रवेश केला आहे. विद्यार्थी दशका पासून चळवळीत असणारे मागासवर्गीय युवक नेते अमित साळुंखे हे शोषित वंचित दुर्बल गरीब घटकांच्या न्याय हक्कासाठी आदोंलन मोर्चे काढत एकत्रीत लढा उभारून या समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहेत.

अमित साळुंखे यांनी शिवसेनेचे धनुष्यबान हाती घेतल्यानंतर शिवसेना उपनेते तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी सेना महाराष्ट्र संघटक अध्यक्ष अनिल चंद्रकांत पडवळ यांनी पक्षीय कार्यकारणीतील जबाबदारी असणारे महत्त्वाचे पद देऊन महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख पदी अमित साळुंखे (बी.ए.बी.एड्) याची नियुक्ती केली आहे. 

सोबत त्याचे पदाधिकारी अजय बरूचा, हर्षल पाटील,  राजेश शर्मा, अरूणकुमार गुप्ता, अश्विन पाटणे, कपिल गौड, विजय गौड, कुणाल साळुंके,  वसंत साळुंखे,  विजय गौड, तसेच अनेक पदाधिकारी यांनीही  शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन