शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन मुंबई / रमेश औताडे सन २०१२ ते २०१९ पर्यंत कर्तव्य बजावलेल्या राज्यातील १०० पेक्षा कमी पट झालेल्या सर्व निदेशकांना नेमणूक मिळावी, विस्थापित झालेल्या निदेशकांना ते ज्या शाळेवर कार्यरत होते त्याच शाळेवर त्वरित नेमणूक मिळावी, सर्वांना नियुक्ती मिळाल्यानंतर ती नियुक्ती कायम करावी, त्यासाठी कायम संवर्ग तयार करावा, किमान वेतन व सर्व निदेशकांना शिक्षकाचा दर्जा देणे या प्रमुख मागणीसाठी कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षक कृती समितीच्या वतीने २० जानेवारी २०२५ सोमवारपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन उपोषण सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी २३ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर व तत्कालीन शिक्षणायुक्त सुरज मांढरे यांनी राज्यातील सर्व निदेशकांच्या नेमणुकी संदर्भात १०...
Comments
Post a Comment