ओव्हेरियन टॉर्शन एक आपत्कालीन वैद्यकिय स्थिती
ओव्हेरियन टॉर्शन एक आपत्कालीन वैद्यकिय स्थिती
नवी मुंबई / रमेश औताडे
ओव्हेरियन टॉर्शन (ॲडनेक्सल टॉर्शन) हे अंडाशयाला पिळ बसल्याने रक्तपुरवठा खंडित झाल्यावर उद्भवणारी समस्या आहे. त्यावर उपचार करण्यात अयशस्वी झाल्यास गर्भाशयाच्या ऊती मृत पावणे, संसर्ग, वंध्यत्व आणि रक्त गोठणे या सारख्या समस्या उद्भवतात. 'क्लिनिकल, पॅथॉलॉजिकल आणि सर्जिकल ॲस्पेक्ट्स ऑफ ओव्हेरियन टॉर्शन' हा अभ्यास 2023 MGM जर्नल ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये प्रकाशित झाला होता, नवी मुंबईतील वरिष्ठ प्रसूती तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, लॅपरोस्कोपिस्ट आणि वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ कल्पना गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला होता. यांच्यासह डॉ. तान्या एस. विजन, डॉ आयशा एफ. ॲडम, डॉ. आकृती अनुराग, डॉ. सौम्या जोशी यांनी 2 वर्षांहून अधिक कालावधीत झालेल्या गर्भाशयाच्या टॉर्शनच्या प्रकरणांची तपासणी केली. लॅप्रोटॉमी, लॅपरोस्कोपी किंवा डिटोर्शनसह पारंपारीक पध्दतीद्वारे केलेले व्यवस्थापन यासारखे उपचार यावर केले जाऊ शकतात हे या अभ्यासातून आढळून आले आहे.
(2020-2022) दरम्यान वैद्यकिय इतिहास, नियमित रक्त तपासणी आणि रुग्णसंख्येनुसार असलेल्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक रुग्णासाठी अल्ट्रासाऊंड तपासणी आणि गर्भाशयाच्या टॉर्शनचे निदान करण्यात आले. गुंतागुंत असलेल्या शस्त्रक्रियेचे परिणाम नोंदवले गेले. एकूण 18 रूग्णांवर 2 वर्षांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अभ्यास करण्यात आलेल्या वयोगटातील सर्व रूग्ण प्रजनन वयोगटातील होते आणि 72.2% रूग्णांना जेव्हा आपत्कालीन कक्षात दाखल केले तेव्हा ते अत्यंत स्थिर होते. एकूण 77.8% रुग्णांचे अचूक निदान झाले आणि अल्ट्रासोनोग्राफीद्वारे हे निदान केले होते. एकूण 22.2% महिलांना अल्ट्रासाऊंडनंतर ॲडनेक्सल टॉर्शनचे निदान झाले. अठरापैकी नऊ महिला रुग्ण कधीही गरोदर नव्हत्या, त्यापैकी पाच रुग्णांना तोंडावाटे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याचा इतिहास होता.
चार गर्भवती रूग्णांपैकी, तिघांना उजव्या बाजूचे ऍडनेक्सल टॉर्शन (75%) होते.
ओव्हेरियन टॉर्शन ही एक वैद्यकीय गुंतागुंत आहे. त्याच्या लक्षणांमध्ये पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि ताप यांचा समावेश होतो. वेदनांची तीव्रता, स्वरूप, स्थान आणि कालावधी हे प्रत्येक रुग्णानुसार बदलू शकते. सिग्मॉइड कोलन नसल्यामुळे टॉर्शन उजव्या बाजूला अधिक सामान्य आहे.
डॉ गुप्ता पुढे सांगतात की, ओव्हेरियन टॉर्शन ही एक स्त्रीरोगविषयक आपत्कालीन स्थिती आहे ज्यासाठी त्वरित हस्तक्षेप आवश्यक आहे. लॅपरोटॉमी, लॅपरोस्कोपी किंवा डिटोर्शनसह पारंपारीक व्यवस्थापन यासारख्या पद्धती निवडक उपचार असू शकतात.
Comments
Post a Comment