महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई / रमेश औताडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्या वतीने मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
५ डिसेंबर रोजी १.०० वाजता सुभाष हाँटेल चेंबूर येथे कार्यकर्त्यांची बैठक, ३.०० वाजता वरळी स्मशानभूमी माता रमाई यांच्या स्मारक स्थळाला भेट आणि अभिवादन, सायं ५ .०० वाजता कार्यकर्ता घर चलो अभियानाचा प्रांरभ, सायं १२.०० वाजता आंबेडकर गार्डन चेंबूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन होणार आहे.
६ डिसेंबर सकाळी ११.०० वाजता बौद्ध भुमी भेट, १.०० वाजता उल्हासनगर ३ नंबर येथे ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक, ३.०० वाजता मुंब्रा येथे मुस्लिम अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, सायंकाळी ६ .०० वाजता दादर फुल मार्केट कामत हाॅटेल येथून चेतना मार्च चैत्यभूमी पर्यंत , ७ डिसेंबर सकाळी ११.०० वाजता विक्रोळी ग्रुप नंबर ३ येथून कार्यकर्त्यां के घर चलो अभियान, कन्नमवार, भांडुप, मुंलूड, रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर, कुर्ला, चैबूर, मानखुर्द,लाल डोंगर, पनवेल येथे सागंता. होणार आहे .
या संपूर्ण कार्यक्रमात स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे प्रसिद्धी आणि प्रसारण प्रमुख शाम भाई बागुल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment