पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई / रमेश औताडे 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वं. यंशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या पावन भूमीत २१ डिसेंबर  रोजी राज्यस्तरीय “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

याप्रसंगी प्रमुख अतिथी आणि सत्कारमुर्ती म्हणून डाँ.निळकंठ धारेश्वर महाराज तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांच्याहस्ते पत्रकार भीमराव धुळप यांना सन्मानित करण्यात आले.

धुळप यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्याची स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट परिवाराने दखल घेऊन निवड केली होती.  याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डाँ.संदिप डाकवे, पत्रकार, कवी गजानन तुपे, पार्श्वगायिका कविता राम,निर्माते विठ्ठल डाकवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

भीमराव धुळप यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून ते धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक तसेच डीडी न्यूज चे संपादक आहेत. गेली अनेक वर्ष ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत अग्रेसर असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना ते वैद्यकीय मदत मिळवून देत असतात त्याचबरोबर दिव्यांग बाधव, वृद्धाश्रम अनाथ आश्रम या ठिकाणी देखील त्यांचे विविध उपक्रम ते राबवत असतात आतापर्यंत त्यांना 21 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

याच कार्याची दखल घेऊन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप टाकवे यांनी त्यांना राज्यस्तरीय फ्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 

पुरस्कार मिळाल्यानंतर  धुळप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो आणि ते देत असताना आपलं कार्य करताना इतरांनाही आपल्या हातून काहीतरी मिळावं या उद्देशाने हे सामाजिक व शैक्षणिक कार्य माझ्या हातून घडते.

 परमेश्वराने मला कोणतेच व्यसन लावले नाही. आणि म्हणून जर मी व्यसन करत असतो तर त्यासाठी माझा किती खर्च झाला असता. याचा विचार करून तो खर्च मी सामाजिक कार्यासाठी विविध उपक्रम राबवत करत असतो.

 डाँ.संदिप डाकवे यांच्या स्पंदन चँरीटेबल ट्रस्टने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे.  या पुरस्कार माझ्या भूमीत कराड शहरात मिळाला यांचा मला सार्थ अभिमान आहे. हा माझा पुरस्कार माझी आई कै. बाळकाबाई धुळप हिच्या चरणी अर्पण करतो.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने