" खारफुटी " मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने चिंता


 
    फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया च्या अहवालात 

" खारफुटी " मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने चिंता


मुंबई / रमेश औताडे 

भारतीय वन व पर्यावरण विभाग प्रत्येक वर्षी पर्यावरण अहवाल सादर करत असते. निसर्ग, हवामान, तापमान, स्वच्छ पाणी या बाबींचा विचार करता सर्वात महत्वाचे म्हणजे समुद्र व किनारपट्टी या पर्यावरणीय समतोलाबाबत " खारफुटी " मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असल्याची बाब या अहवालात समोर आली आहे.

सर्वात जास्त म्हणजे ठाणे जिल्ह्याने २०२१ -२३ मध्ये ९३ हेक्टर खारफुटी नष्ट केली आहे. ९३ हेक्टर खारफुटी म्हणजे ९ मुंबई आझाद मैदानांच्या आकारा एव्हडी खारफुटी नष्ट केली असल्याचे चित्र समोर आले आहे. खारफुटी ची झाडे समुद्रातील वादळ, भरती-ओहोटी आणि त्सुनामी यांसारख्या समुद्रातील गतिशीलतेविरुद्ध नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतात.

ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर या तीन जिल्ह्याममध्ये  ११ मुंबई आझाद मैदानां इतके क्षेत्रफळ नष्ट केले आहे . नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी "पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटच्या नावाखाली अव्यवस्थित, बेफिकीर विकास" याला दोष दिला आहे.

जमीन बळकावण्याची आणि भूमाफियांची प्रकरणे समोर आली आहेत ज्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्याची राज्य सरकारची योजना अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.  सरकारने याला प्राधान्य दिले पाहिजे, असे बी एन कुमार यांनी यावेळी सांगितले .


 


Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"