महाराष्ट्राच्या दहीहंडीला आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ
मुंबई / रमेश औताडे
बहुप्रतिक्षित " प्रो गोविंदा लीग सीझन ४ " हा दहीहंडी क्रीडा महोत्सव यंदा प्रथमच जियो हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित होणार असल्याने महाराष्ट्राच्या दहीहंडी परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठे डिजिटल व्यासपीठ मिळणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना या स्पर्धेचा थरार अनुभवता येणार आहे. अशी माहिती प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिली.
श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेऊन यंदाचा प्रो गोविंदा सीझन ४ ची घोषणा केली. येत्या २५, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी हा थरार होणार आहे. पुर्वेश सरनाईक यांनी श्री सिद्धिविनायकाच्या साक्षीने
लीगच्या अधिकृत शुभंकर (मॅस्कॉट) 'बिट्टू बॉस' ची पहिली सार्वजनिक ओळख करून त्याचे अनावरण केले.
'बिट्टू बॉस' हे केवळ लीगचे शुभंकर नसून त्यामागे एक भावनिक आठवण दडली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका छोट्या बिबट्याला दत्तक घेतले होते, ज्याचे नाव 'बिट्टू बॉस' असे होते. काही दिवसांपूर्वीच त्याचे आकस्मिक निधन झाले असून, त्याच्याच स्मरणार्थ हा अधिकृत मॅस्कॉट साकारण्यात आला आहे.
Comments
Post a Comment