रखडलेल्या प्रमुख रस्ते महामार्गांना आता गती मिळणार

मुंबई / रमेश औताडे

वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता रखडलेल्या प्रमुख महामार्ग प्रकल्पांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-शिक्रापूर या मार्गांचे भूमिपूजन झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, नाशिकफाटा-राजगुरुनगर मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेलाही गती मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व लेखक अशोकराव टाव्हरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांबाबत लेखी पत्राद्वारे आभार व्यक्त केले. टाव्हरे यांची गडकरी यांच्या कार्यावर आधारित मराठीत विकासाचा राजमार्ग व इंग्रजीत हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही पुस्तके प्रकाशित आहेत. पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-शिक्रापूर महामार्गांचे झालेले भूमीपूजन व नाशिकफाटा ते राजगुरुनगर भूसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास येत आहे.

भुसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास येत असून लवकरच नाशिकफाटा- राजगुरुनगर या इलेव्हेटेड मार्गाचे भूमीपूजन संपन्न होणार आहे. नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  पुणे-शिरूर, तळेगाव-शिक्रापुर, हडपसर-यवत या मार्गांचे भूमीपूजन संपन्न झाले आहे. रस्तेविकास व महामार्ग मंत्री म्हणून पायाभूत सुविधांचा झालेला विकास अलौकिक आहे. रस्ते प्रकल्पांचे झालेले भूमीपूजन यामुळे भावी काळात वाहतुक कोंडीची समस्या संपुष्टात येईल असे नितीन गडकरींची भेट घेऊन आभार व्यक्त केल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश