मुंबै बँकेचे बेरोजगारांना व्यवसाय मोफत मार्गदर्शन

मुंबई / रमेश औताडे 

बृहन्मुंबई बेरोजगार व सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन लि. आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 'सहकार भूषण पुरस्कार – २०२६' आणि विशेष सहकार मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. फोर्ट येथील मुंबई बँकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात ११ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला बेरोजगार व सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठा प्रतिसाद दिला.

बेरोजगार संस्थांचे मार्गदर्शक मा. श्री. नंदकुमार काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध संस्थांचा भव्य गौरव करण्यात आला.

या सहकार मेळाव्यात प्रतिनिधींना व्यवसायाच्या विविध नव-नवीन संधी आणि व्यक्तिमत्व विकासावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः सरकारी कामांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी 'GEM' (Government e-Marketplace) पोर्टलवर मोफत नोंदणी आणि शासकीय टेंडर प्रक्रियेत सहभागी कसे व्हावे, याबद्दल तज्ज्ञांनी मोफत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले.

या सोहळ्याचे निमंत्रक आणि बेरोजगार संस्थांचे फेडरेशन (बृहन्मुंबई / शहर / पूर्व व पश्चिम उपनगरे) चे अध्यक्ष श्री. जयंत शिरीषकर, बाळासाहेब घाडगे, श्री. विजय केदारे, श्री. प्रकाश मेस्त्री आणि श्री. गंगाधर शेळके यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

उपस्थित सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी मिळालेल्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले व या उपक्रमाचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश