अंकुशराव पाटील होनाळीकर यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय मराठा पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.

या प्रसंगी राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष परमेश्वर देशमुख आणि राष्ट्रीय सहसचिव शुभम पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.

निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील संवेदनशील ५०० मीटरच्या परिसरातील सर्व दारू दुकाने बंद करण्यात यावीत, लोणावळा ते ऊरळी कांचन (पुणे) दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, तसेच लातूर जिल्ह्यातील देवणी येथे बस डेपो आणि महापारेषण १३२ सबस्टेशन निर्माण करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

यासोबतच मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक त्वरित उभारण्यात यावे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास ८५० कोटी रुपये देऊन ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या या निवेदनावर सर्व मुद्द्यांचा विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

संपादक रमेश औताडे 
7021777291

.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश