सरकारी रिक्त पदे भरण्यासाठी धरणे आंदोलन

मुंबई / रमेश औताडे

राज्यातील शासकीय व निमशासकीय विभागांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच वंचित समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे  सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी  आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन करणार असे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सहदेवराव तयाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वन विभाग, सिडको, एमआयडीसी, महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. अन्यायग्रस्त आदिवासी, भटके व विमुक्त समाजाच्या विविध प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करावी, संबंधितांना न्याय द्यावा आणि शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही आरपीआय (आठवले) पक्षाच्या  वतीने करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश