साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ऐक्याचा संदेश
साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ऐक्याचा संदेश
मुंबई / रमेश औताडे
लोकशाहीर साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध, मातंग, चर्मकार आणि वाल्मिकी समाजाच्या भाईचारा ऐक्य संदेश अभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, समता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित समाज परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे म्हणाले, "एकेकाळी आमच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता. भाकरीचा तुकडा देणे तर दूरच राहिले. अशा परिस्थितीत तत्कालीन महार समाजाने साथ दिली, संगतीत आणि पंगतीत स्थान दिले. हा इतिहास विसरून चालणार नाही. म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी 'जग बदल घालुनी घाव, मला सांगून गेले भीमराव' असा संदेश दिला. मात्र आजही समाजातील काही घटक हा इतिहास मनापासून स्वीकारत नाहीत," असे त्यांनी मार्मिक भाष्य केले.
या अभियानाचे नेतृत्व आंबेडकरी मातंग मोर्चाचे मनोहर इंगोले, वाल्मिकी समाजाचे नेते रमेश डकाह, चर्मकार समाजाचे नेते अॅड. राजकुमार शेंडे आणि प्रा. रमेश दुपारे, जयदेव चिंवडेयांनी केले.
यावेळी प्रवीण आवळे, चरणदास गायकवाड, राजू पांजरे, के. टी. कांबळे, नरेश खन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment