कामगारांचा लढा पूर्णपणे विनामूल्य लढणार - ॲड. प्रकाश देवदास


मुंबई / रमेश औताडे 

मुंबई महानगरपालिकेच्या कचरा संकलन, परिवहन व निष्कासन विभागाच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात तीव्र भूमिका जाहीर करत अँड. प्रकाश देवदास, डॉ. एम. नवनाथ महारणवर, डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच  पालिकेतील मोटर लोडर्स आणि इतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी न्यायालयीन लढा पूर्णपणे विनामूल्य लढविण्यात येईल असेही ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

कचरा संकलन, परिवहन आणि निष्कासन  या सेवांच्या खाजगीकरणाच्या निविदेला विरोध करणार नसल्याचे मान्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या करारावर स्वाक्षरी न केलेल्या सर्व मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्र येत "मुंबई मनपा खाजगीकरण विरोधी समिती" स्थापन केली असून, खाजगीकरणाविरोधातील आंदोलनाची दिशा आणि न्यायालयीन लढ्याची घोषणा आज आम्ही करत आहोत.

ॲड.. प्रकाश देवदास यांनी स्पष्ट केले की, खाजगीकरणामुळे सर्वाधिक फटका बसणाऱ्या मोटर लोडर्स आणि इतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात प्रभावी लढा उभारण्यात येईल. या प्रकरणासाठी कोणत्याही मोटर लोडर्सकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही फी अथवा आर्थिक रक्कम घेतली जाणार नाही. काही मान्यताप्राप्त संघटनांनी महापालिकेसोबत केलेल्या करारामुळे कंत्राटीकरणाला मार्ग मोकळा झाला असून तमोटर लोडर्ससह अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ कामगारांच्या न्याय हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहील आणि आवश्यक ते सर्व कायदेशीर व संघटनात्मक प्रयत्न करेल व पुढील दिशा ठरवण्यासाठी आठ-दहा दिवसात बैठका घेणार त्यानंतर मेळावा  घेण्याचे निश्चित करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश